दिल्ली, 22 एप्रिल : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाव्हायरसवर (Coronavirus) अद्यापही सुरक्षित आणि प्रभावी अशी लस आणि औषध नाही. अशात कोरोनाग्रस्तांसाठी आता आशेचा किरण आहे, ते प्लाझ्मा थेरेपी (Plazma Therepy). भारतात कोरोना रुग्णावरील पहिली प्लाझ्मा थेरेपी यशस्वी ठरली आहे. दिल्लीतील एका खासगी रुग्णालातील 49 वर्षीय गंभीर कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरेपीने उपचार करण्यात आले. उपचारानंतर 4 दिवसांतच या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.
The first patient who was administered Plasma Therapy on compassionate grounds at Max Hospital, Saket has shown positive results & was recently weaned off ventilator support. The patient is a 49-year-old, male from Delhi who had tested COVID positive on April 4th: Max Healthcare pic.twitter.com/7QHimVZ4J4
— ANI (@ANI) April 20, 2020
मीडिया रिपोर्टनुसार, मॅक्स हॉस्पिटलमधील रुग्णाला सोमवारी वेंटिलेटरवरून हटवण्यात आलं आहे, त्यानंतर रुग्णाच्या प्रकृती सुधारत असल्याचं सांगण्यात येतं आहे. या रुग्णालयात एकाच कुटुंबातील अनेक कोरोना रुग्ण दाखल होते. त्यापैकी दोघं वेंटिलेटरवर होते. वेंटिलेटरवरील एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या रुग्णावर प्लाझ्मा थेरेपी सुरू करण्यात आली. हे वाचा - Corona पासून बचावासाठी मास्क वापरण्याचा आग्रह, काळजी घ्या नाहीतर होईल उलट परिणाम याआधी एबोलासारख्या आजारावर वापरण्यात आलेली ही उपचार पद्धती कोविड-19 वरही परिणामकारक ठरत असल्याचं आता काही अभ्यासात दिसून आलं आहे. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांवर याच पद्धतीने उपचार करण्यात आले. 5 रुग्ण बरे झालेत, त्यामध्ये 3 भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे. ह्युस्टनमधील बेलर सेंट ल्युक मेडिकल सेंटरमध्ये 5 रुग्ण भरती होते. महाराष्ट्र सरकारनेही केंद्र सरकारकडे प्लाझ्मा थेरेपीने कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी परवानगी मागितली आहे. काय आहे प्लाझ्मा थेरेपी? डॉक्टरांनी सांगितलं की, जो रुग्ण 3 आठवड्यांपूर्वी बरा झाला आहे, त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा घेतले जातात. एका व्यक्तीच्या रक्तातून जास्तीत जास्त 800 मिलीलीटर प्लाझ्मा घेतलं जाऊ शकतो, तर कोरोना रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज टाकण्यासाठी 200 मिलीमीटर प्लाझ्मा चढवलं जातं.
दिल्लीतील AIIMS चे रणदीप गुलेरिया म्हणाले, “कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याच्या रक्तात या अँटिबॉडीज कायम असतात. अशा व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा कोरोना रुग्णाच्या शरीरात सोडले जातात. जेणेकरून त्या प्लाझ्मातील अँटिबॉडीज रुग्णाच्या शरीरातील व्हायरसशी लढतील.” हे वाचा - …तर कोरोनामुळे परिस्थिती आणखी वाईट होईल, WHOने दिला साऱ्या जगाला इशारा
“याला सरकारकडून परवानगी मिळाल्यास मोठ्या संख्येने रुग्णांवर ही उपचार पद्धती वापरून त्यांना वाचवता येईल. मात्र त्यासाठी कोरोनावर मात केलेल्या रुग्णांनी रक्तदान करणं गरजेचं आहे”, असंही गुलेरिया म्हणाले. संपादन - प्रिया लाड

)







