हे फक्त आपल्याच देशात होऊ शकतं! कोरोनाव्हायरसशी दोन हात करणाऱ्या मोदी सरकारला भारतीयांचं सॅल्युट

हे फक्त आपल्याच देशात होऊ शकतं! कोरोनाव्हायरसशी दोन हात करणाऱ्या मोदी सरकारला भारतीयांचं सॅल्युट

भारतात (India) कोरोनाव्हायरस (coronavirus) रुग्णांचा आकडा शंभरीपार गेला आहे. मात्र तरीही त्याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारची सुरू असलेली धडपड पाहता भारतीयांनी कौतुक केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मार्च : इतर देशांप्रमाणे आता भारतात (India) कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांचा आकडा वाढतो आहे. मात्र तरीही भारतीयांनी (Indian) यासाठी मोदी सरकारला (modi government) जबाबदार न ठरवता उलट सरकारचं कौतुक केलं आहे. केंद्र सरकार कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी नेमकं काय काय करत आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे भारतीय सोशल मीडियावर (social media) व्यक्त झालेत. कोरोनाव्हायरसशी दोनहात करणऱ्या मोदी सरकारला भारतातील नागरिकांनी सॅल्युट केलं आहे.

भारतात कोरोनाव्हायरसबाबत किती विशिष्ट पद्धतीने काम सुरू आहे, हे सांगणाऱ्या एका प्रवाशाची पोस्ट एका पत्रकाराने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

यामध्ये या महिलेने आपण यूएसहून टोकियोमार्गे दिल्लीत आल्याचं सांगितलं. भारतात आल्यानंतर रुग्णालयात तिची चाचणी झाली, तरीदेखील 4 दिवसांतच तिला दिल्लीतल्या राममनोहर लुहिया हॉस्पिटल आणि विमानतळ प्रशासनाकडून फोन आल्याचं ती म्हणाली. जरी तिला कोरोनाव्हायरसची लागण झाली नव्हती, तरीदेखील त्याच वेळी इटलीहून आलेलं विमानही लँड झालं होतं, त्यामुळे कुणाला व्हायरसची लागण तर झाली नाही ना याची पडताळणी सरकारला करायची होती, असं तिला सांगितल्याचं तिनं म्हटलं. तसंच तिला 2 आठवडे घरातच राहण्याचा, कुणाशी थेट संपर्क न ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला.  सरकारी अधिकारी सुट्टीच्या दिवशीही स्वत: संपर्क करून विचारपूस करत आहेत, आतापर्यंत तरी असं घडलं नव्हतं, त्यामुळे विश्वासच बसत नाही, असंही या महिलेनं लिहिलं आहे.

हे वाचा - मुंबईकरांनो काळजी घ्या, शहरात कोरोनाव्हायरसचे 80 संशयित रुग्ण

असाच काहीसा अनुभव गेल्या आठवड्यात श्रीलंकेहून भारतात परतलेल्या संदीप नागी यांचाही आहे.

रजत गुप्ता नावाच्या एका व्यक्तीनंही फेसबुकवर असाच आपला अनुभव शेअर केला आहे. त्यांनी सांगितलं, विमानाच्या प्रवेशद्वाराबाहेरच आरोग्य आणि विमानतळावरील अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येकाची स्क्रिनिंग केली गेली. प्रवाशांचा बॅगही वेगळ्या ठेवण्यात आल्या होत्या, जेणेकरून व्हायरसचा संसर्ग होणार नाही.

डलास आणि न्यू जर्सीमधील विमानतळावरील तपासणीपेक्षा दिल्ली विमानतळावर करण्यात आलेली आमची तपासणी खूपच वेगळी होती, असं म्हणत रजत गुप्ता यांनी भारत सरकारला सॅल्युट केलं आहे.

जम्मू-काश्मीरमधील पोलीस अधिकारी इम्तियाज हुसेन यांनीही कोरोना प्रभावित देशांमधून भारतीयांची सुटका करणाऱ्या केंद्र सरकारचे ट्विटरवर आभार मानलेत. भारतात कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या 107 वर पोहोचली आहे. मात्र त्याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, हेच यामधून दिसून येतं.

हे वाचा - गोमूत्र पिऊन कोरोनाव्हायरसवर उपचार, Video पाहून रिचा चड्ढालाही बसला शॉक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2020 06:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading