मुंबईकरांनो काळजी घ्या, शहरात कोरोनाव्हायरसचे 80 संशयित रुग्ण
मुंबईतल्या (Mumbai) कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) 80 संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मुंबई, 15 मार्च : राज्यात कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत, तर मुंबईत कोरोनाव्हायरसचे तब्बल 80 संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांनी दिली. त्यामुळे मुंबईकरांनो आरोग्याची काळजी घ्या, कोणत्याही सर्वसामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
मुंबईत कोरोनाव्हायरसचे 5 रुग्ण आहेत आणि 80 संशयित रुग्ण आहेत. या रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाव्हायरस रुग्णांवर सुरू असेलल्या उपचारांचा आणि सोयीसुविधांचा आढावा घेतला.
आज कस्तुरबा गांधी हॉस्पिटल येथे भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच सज्जतेसाठी आवश्यक त्या सूचना हॉस्पिटल प्रशासनाला दिल्या.#coronaviruspic.twitter.com/WCOno3ZBwS
या रुग्णांना जेवण, टीव्ही, वायफाय सुविधा देण्याचा प्रयत्न करत असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. कस्तुरबा रुग्णालयातील लॅबची क्षमता वाढवणार, अहवाल जलद गतीनं मिळावा यासाठी नव्या मशीन्स बसवल्या जाणार आहे. केईएम रुग्णालयातही अशा मशीन्स बसवणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. शिवाय पुण्याव्यतिरिक्त सोलापूर, धुळे, औरंगाबाद आणि मिरज या चार ठिकाणी महिनाभरात लॅब उभारणार असंही राजेश टोपे म्हणाले.
सेव्हन हिल्स हॉस्पिटल,मुंबई महापालिकेने ताब्यात घेतले असून 500 बेड्स उपलब्ध आहेत.हॉस्पिटलमध्ये डागडुजीचे काम झाल्यावर 500 बेड्स उपलब्ध करण्यात येतील.दाखल असलेल्या प्रवाशांबाबत विचारपूस करून डॉक्टरांशी चर्चा केली.येथे आवश्यकतेनुसार मास्क उपलब्ध करून देण्याचा सूचना देखील दिल्या. pic.twitter.com/7mObcOEEj8
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटल,मुंबई येथे भेट दिली. 7 देशातून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईनसाठी कशाप्रकारे सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती घेतली.#coronaviruspic.twitter.com/bOG2l6ZLue
महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या 32 वर पोहोचली आहे. पुण्यात 10, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईत प्रत्येकी 5, नागपुरात 4, यवतमाळमध्ये 2 तर ठाणे, अहमदनगर, कल्याण, पनवेल, नवी मुंबई आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. रुग्णांची संख्या वाढली असली, तर रोगप्रतिकारक शक्तीने या व्हायरसवर मात करणं शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सरकार आणि डॉक्टरांच्या सूचना पाळाव्यात, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेशष टोपे यांनी नागरिकांना केलं आहे.