नवी दिल्ली, 11 मार्च : भारतात (India) कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) धोका आता अधिकच वाढला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल 60 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 60 झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. ANI ने याबाबत ट्विट केलं आहे.
Ministry of Health & Family Welfare, Government of India: 10 new cases of #COVID19 confirmed. 8 cases are from Kerala and 1 each from Rajasthan & Delhi. Total cases rise to 60 across the country. pic.twitter.com/61eGPUKeiE
— ANI (@ANI) March 11, 2020
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, कोविड-19 (COVID19) चे आणखी 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. त्यापैकी 8 केरळमधील आहेत, तर राजस्थान आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 60 झाला आहे. हे वाचा - आरोग्यमंत्र्यांना झाला कोरोना; पंतप्रधानांनाही व्हायरसची लागण होण्याची शक्यता देशात दिल्ली, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्रमध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळून आलेत. महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे एकूण 5 रुग्ण आहेत. पुण्यात हे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे प्रशासन आता सतर्क झालं आहे. पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे, तर तीन शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात हा व्हायरस अधिक पसरू नये, राज्य सरकारनेही हालचाली सुरू केल्यात. हे वाचा - ‘वर्क फ्रॉम होम करू द्या’, पंकजा मुंडेंची मागणी








