Home /News /national /

कोरोनाविरुद्धच्या लढाईत मेच्या पहिल्या आठवड्यात मिळणार चांगली बातमी, गृह मंत्रालयाने दिले संकेत

कोरोनाविरुद्धच्या लढाईत मेच्या पहिल्या आठवड्यात मिळणार चांगली बातमी, गृह मंत्रालयाने दिले संकेत

Medical workers in protective suits entering a building under lockdown in downtown Kuala Lumpur, Malaysia, on Tuesday, April 7, 2020. The Malaysian government issued a restricted movement order to the public to help curb the spread of the new coronavirus. The new coronavirus causes mild or moderate symptoms for most people, but for some, especially older adults and people with existing health problems, it can cause more severe illness or death. (AP Photo/Vincent Thian)

भारतात कोरोनाव्हायरस झपाट्याने पसरत आहे. मात्र पहिल्या लॉकडाऊनच्या तुलनेत दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये चांगले निकाल दिसत आहेत.

    नवी दिल्ली, 17 एप्रिल : भारतात कोरोनाव्हायरस झपाट्याने पसरत आहे. दरम्यान कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. गृह मंत्रालयाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की मेच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल, परंतु त्यानंतर कोरोना रूग्णांची संख्या हळूहळू कमी होईल. याआधी भारतात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्या लॉकडाऊनच्या तुलनेत दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये चांगले निकाल दिसत आहेत. राजस्थान, पंजाब आणि बिहार या राज्यांनी योग्यवेळी लॉकडाऊनची घोषणा केली. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. या राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत झपाट्याने घटली आहे. आरोग्य मंत्रालयाशी संबंधित एका अधिकाऱ्यांने सांगितले की, पुढचा आठवडा फार महत्वाचा ठरणार आहे. कोरोना रूग्णांची आता भारतात वेगाने चाचणी घेण्यात येत आहे. श्वास घेण्यात त्रास होत असलेल्या अशा सर्व लोकांची चाचणी घेण्यात येत आहे. वाचा-खूशखबर! तब्बल 6 भारतीय कंपन्यांनी शोधलं कोरोनावर औषध पण... येत्या काही दिवसांत कोरोना विषाणूच्या रुग्णांत वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी, कोरोना चाचणी जसजशी वाढेल तसतशी लोकांची संख्याही वाढेल. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनमध्ये 19 दिवसांसाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला. देशातील कोरोना संक्रमित रूग्णांचा आकडा 12 हजारांच्या पुढे गेला असताना लॉकडाउनमध्ये वाढ करण्यात आली आहे. या कालावधीत 36 हजार लोकांना सरकारी रुग्णालयात किंवा घरी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. वाचा-नर्ससोबत धक्कादायक प्रकार, गर्दी करू नका असं सांगितलं म्हणून थेट गाडीच पेटवली सरकारसमोर सध्या मोठे आव्हान ते केवळ हॉटस्पॉट भागात कोरोनाची चाचणी करणेच नाही तर तुरळक प्रकरणांवर नियंत्रण ठेवणे देखील आहे. क्लस्टर्समधील लोकांच्या तपासणीमुळे विखुरलेल्या घटनांना पसरण्यापासून रोखणे देखील एक मोठे आव्हान बनले आहे. वाचा-राज्यात आणखी एका कोरोना संशयित डॉक्टरचा मृत्यू, रिपोर्ट येण्याआधीच गेले प्राण आतापर्यंत देशात 420 लोकांचा मृत्यू केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी देशात कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 420 झाली आणि संक्रमित रूग्णांची संख्या 12 हजारांपेक्षा जास्त आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूचे 10,824 रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत, तर 1,514 लोक बरे झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. संसर्गाच्या एकूण प्रकरणांमध्ये 76 विदेशी नागरिकांचा सहभाग आहे. संकलन, संपादन-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या