नवी दिल्ली, 17 एप्रिल : भारतात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी, काही राज्यांमध्ये मात्र मृत्यू दर कमी झाला आहे. त्यामुळे भारताने कोरोनावर मात करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांत प्रथमच 260 लोक कोरोना व्हायरसच्या संक्रमानातून बरे झाले आहे . एकाच दिवशी निरोगी होण्याचा दर 13 टक्क्यांनी वाढला. आतापर्यंत भारतात 1,748 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13 हजार 387 वर पोहचली आहे. मृतांचा आकडा हा 437 आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की मेच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल, परंतु त्यानंतर कोरोना रूग्णांची संख्या हळूहळू कमी होईल. याआधी भारतात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्या लॉकडाऊनच्या तुलनेत दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये चांगले निकाल दिसत आहेत.
भारताला लॉकडाऊनचा फायदा राजस्थान, पंजाब आणि बिहार या राज्यांनी योग्यवेळी लॉकडाऊनची घोषणा केली. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. या राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत झपाट्याने घटली आहे. आरोग्य मंत्रालयाशी संबंधित एका अधिकाऱ्यांने सांगितले की, पुढचा आठवडा फार महत्वाचा ठरणार आहे. कोरोना रूग्णांची आता भारतात वेगाने चाचणी घेण्यात येत आहे. श्वास घेण्यात त्रास होत असलेल्या अशा सर्व लोकांची चाचणी घेण्यात येत आहे. मेच्या पहिल्या आठवड्यानंतर येणार खूशखबर येत्या काही दिवसांत कोरोना विषाणूच्या रुग्णांत वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी, कोरोना चाचणी जसजशी वाढेल तसतशी लोकांची संख्याही वाढेल. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनमध्ये 19 दिवसांसाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला. देशातील कोरोना संक्रमित रूग्णांचा आकडा 12 हजारांच्या पुढे गेला असताना लॉकडाउनमध्ये वाढ करण्यात आली आहे. या कालावधीत 36 हजार लोकांना सरकारी रुग्णालयात किंवा घरी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. संपादन-प्रियांका गावडे.