चीनला मोठा धक्का : 72 तासांत दूतावास बंद करण्याच्या अमेरिकेचा आदेश; चीननेही दिली उलट धमकी

चीनला मोठा धक्का : 72 तासांत दूतावास बंद करण्याच्या अमेरिकेचा आदेश; चीननेही दिली उलट धमकी

ह्यूस्टन (houston) वाणिज्य दूतावास तीन दिवसांत बंद करून गाशा गुंडाळा, अशा आदेश अमेरिकेने चीनला दिला आहे. त्यावर चीननेही उलट धमकी दिली आहे. आता हा तणाव शीतयुद्धात परावर्तित होतो काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

ह्यूस्टन (अमेरिका), 22 जुलै : अमेरिका आणि चीनचे (USA china) संबंध आता आणखी ताणले गेले आहेत. अमेरिकेने चक्क ह्यूस्टनमधला वाणिज्य दूतावास (Houston Consulate) बंद करण्याचे आदेश चीनला दिल्याने खळबळ उडाली आहे. आता या दोन देशांमधला तणाव शीतयुद्धाकडे (cold war) नेतो काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. कारण अमेरिकेच्या आदेशावरून चिडून चीननेही परिणाम भोगावे लागतील, अशी उलट धमकी दिली आहे.

टेक्सास प्रांतात ह्यूस्टन इथे असणारा चिनी दूतावास 72 तासांत रिकामा करा, असे आदेश अमेरिकेने दिले. अमेरिकेच्या या आदेशानंतर चीनच्या दूतावासात धूर येत असल्याचे दिसलं. चिनी कर्मचारी गोपनीय कायदपत्रं जाळत असल्याचा अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांचा दावा आहे. अमेरिकेच्या या आदेशानंतर चीनदेखील भडकला आहे आणि या आदेशानंतर प्रत्युत्तर देणार असल्याचं सांगितलं आहे.

इतक्या कमी वेळात महावाणिज्य दूतावास रिकामी करण्याच्या आदेशानंतर चीनचे परराष्ट्र मंत्रालयात गोंधळ उडाला आहे. अमेरिकेच्या आदेशानंतर चिनी दूतावासाच्या आत गोंधळ उडाला असून वातावरण तणावपूर्ण झालं आहे. इतकचं नाही तर चिनी कर्मचारीही मोठ्या संख्येने गोपनीय कागदपत्रं जाळत असल्याचे दिसून आले आहे. कर्मचारी कागदपत्रं जाळत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 22, 2020, 7:06 PM IST

ताज्या बातम्या