मराठी बातम्या /बातम्या /देश /

चीनविरुद्ध लष्कराकडे आता तिसरा डोळा , ‘भारत’ ठेवणार ड्रॅगनच्या हालचालींवर करडी नजर

चीनविरुद्ध लष्कराकडे आता तिसरा डोळा , ‘भारत’ ठेवणार ड्रॅगनच्या हालचालींवर करडी नजर

हे अस्त्र लष्कराचा तिसरा डोळा  ठरणार असून सीमेवर ड्रॅगन करत असलेल्या हालचालींवर त्याची गुप्त नजर असणार आहे.

हे अस्त्र लष्कराचा तिसरा डोळा ठरणार असून सीमेवर ड्रॅगन करत असलेल्या हालचालींवर त्याची गुप्त नजर असणार आहे.

हे अस्त्र लष्कराचा तिसरा डोळा ठरणार असून सीमेवर ड्रॅगन करत असलेल्या हालचालींवर त्याची गुप्त नजर असणार आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar

नवी दिल्ली 21 जुलै: चीनसोबतच्या सीमावादाच्या (India China Border Dispute) पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराकडे (Indian Army) आता नवीन अस्त्र आलं आहे. हे अस्त्र लष्कराचा तिसरा डोळा  ठरणार असून सीमेवर ड्रॅगन करत असलेल्या हालचालींवर त्याची गुप्त नजर असणार आहे. लष्करासाठी DRDOने ‘भारत’ हे खास ड्रोन (Drone technology) विकसित केलं असून लेह-लडाखच्या दुर्गम सीमावर्ती भागात ते लष्करासाठी वापरण्यात येणार आहे. अतिशय प्रतिकूल निसर्ग आणि दऱ्या खोऱ्यांच्या या प्रदेशात त्यामुळे लष्कराला मोठा फायदा होणार आहे.

अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे या भागात गस्त घालणाऱ्या सैनिकांना काम करणं हे आव्हानात्मक असतं. त्यात चीन सगळे नियम पायदळी तुडवत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा खोल दऱ्यांमध्ये किंवा उंच टेकड्यांवर नेमकं काय चाललं हे कळत नाही. त्यामुळे अशा वेळी ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो.

DRDOने ‘भारत’ या श्रेणीतले ड्रोन्स विकसित केले असून त्याचा दर्जा आणि गुणवत्ता ही जागतिक दर्जाची असल्याचं सिद्ध झालं आहे. या ड्रोन्समध्ये AIयंत्रणा असून त्याच्या फुटेजची गुणवत्ताही ही सर्वोच्च आहे. शत्रूची बारिक-सारिक हालचाल टिपण्याची क्षमता त्यात असून लोकेशन आणि इतर माहितीही तत्काळ कळू शकणार आहे.

दरम्यान, वायुसेनाने सांगितले की – 5 राफेल विमानं जुलै 2020 पर्यंत भारतात येणं अपेक्षित आहे. ही विमानं 29 जुलै रोजी वातावरणाच्या बदलानुसार वायु सेना स्टेशन अंबालामध्ये सहभागी केलं जाईल.

‘मेड इन इंडिया’चा डंका; चीनवरील बंदीनंतर लघु उद्योजकांना सुगीचे दिवस

भारतीय वायुसेनाचे वरिष्ठ कमांडर बुधवारपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय संमेलनात देशाची वायु रक्षा प्रणालीची समीक्षा करतील. यामध्ये चीनसोबत झालेल्या वादानंतर लडाख क्षेत्रात राफेल लडाऊ विमान तैनात करण्याबाबत चर्चा केली जाईल. सैन्य सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमांडरांच्या लडाख क्षेत्रात या महिन्याच्या शेवटपर्यंत तब्बल 5 राफेल विमानं पहिल्या टप्प्यात तैनात करण्याबाबत विशेष करुन चर्चा करण्याची शक्यता आहे.

First published: