मराठी बातम्या /बातम्या /देश /लडाखनंतर आता उत्तराखंडमध्ये LAC जवळ चीनच्या हालचाली वाढल्या; भारतही सज्ज

लडाखनंतर आता उत्तराखंडमध्ये LAC जवळ चीनच्या हालचाली वाढल्या; भारतही सज्ज

India China Standndoff: चीनच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. अलीकडेच उत्तराखंड सीमाभागात चिनी लष्कराची (People's Liberation Army) एक तुकडी सक्रिय असल्याचं दिसलं होतं.

India China Standndoff: चीनच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. अलीकडेच उत्तराखंड सीमाभागात चिनी लष्कराची (People's Liberation Army) एक तुकडी सक्रिय असल्याचं दिसलं होतं.

India China Standndoff: चीनच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. अलीकडेच उत्तराखंड सीमाभागात चिनी लष्कराची (People's Liberation Army) एक तुकडी सक्रिय असल्याचं दिसलं होतं.

  नवी दिल्ली, 21 जुलै : गेल्या एका वर्षापेक्षा जास्त काळ लडाखमध्ये (Ladakh) चिनी सैन्याकडून काही ना काही हालचाली सुरू असल्यामुळे भारत-चीन या देशांमध्ये (India-China Standoff) तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आता चिनी सैन्याने उत्तराखंड (Uttarakhand) राज्याच्या बाराहोटी (Barahoti) भागात प्रत्यक्ष ताबारेषेच्या (Line of Actual Control) जवळ आपल्या हालचाली मोठ्या प्रमाणावर वाढवल्या आहेत. अलीकडेच या भागात पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (People's Liberation Army) सैनिकांची एक तुकडी सक्रिय असल्याचं दिसलं होतं. सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, 'चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या 35 सैनिकांची एक प्लाटून उत्तराखंड राज्याच्या बाराहोटी परिसरात सर्वेक्षण करताना अलीकडेच दिसून आली.'

  या भागात काही वेळाच्या अंतराने चिनी सैनिकांच्या (Chinese Army) काही हालचाली सुरू होत्या. तसंच या भागाचं सर्वेक्षणही (Survey) त्यांच्याकडून केलं जात होतं, असंही सूत्रांनी सांगितलं.

  भारतानेही त्या भागात आवश्यक ती व्यवस्था सज्ज ठेवली आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली. चीनच्या सुरक्षा व्यवस्थेकडे पाहता या भागात काही कृत्य करण्याचा त्यांचा इरादा असल्याचं वाटत आहे; मात्र संपूर्ण मध्य क्षेत्रात संपूर्णपणे भारताची तयारी खूप चांगली आणि अधिक आहे, असंही त्या सूत्रांनी स्पष्ट केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (General Bipin Rawat) आणि केंद्रीय सैन्य प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय डिमरी यांनीही अलीकडेच सीमावर्ती भागाचा दौरा केला आहे आणि तिथली परिस्थिती, तसंच तयारीचा आढावा घेतला आहे, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं.

  चीनमध्ये चार दिवसात पडला वर्षभराचा पाऊस, एका तासात कहऱ, पाहा Video

  बाराहोटी भागाच्या जवळच्या एका हवाई तळावर (Air Base) चिनी सैनिकांच्या हालचाली जलद झाल्या असून, तिथे त्यांनी मोठ्या संख्येने ड्रोन (Drone) तैनात ठेवले असल्याचं दिसून आलं आहे.

  भारताने केंद्रीय क्षेत्रात अतिरिक्त जवान तैनात केले असून, अनेक ठिकाणी पाठीमागच्या भागात असलेले जवान पुढे सरकले आहेत. भारतीय हवाई दलानेही काही हवाई तळ सक्रिय केले आहेत. त्यात चिन्यालीसौंड अॅडव्हान्स लँडिग ग्राउंडचा समावेश आहे. तिथे एएन-32 विमानं (AN-32) सातत्याने लँडिंग करत आहेत.

  भारताने LAC बाबत दिलेल्या 'या' कडक इशाऱ्यानंतर चीनची सबुरीची भूमिका

  चिनूक हेवी-लिफ्ट हेलिकॉप्टर्सही (Helicopters) त्या क्षेत्रात कार्यरत असून, गरज पडल्यास त्या क्षेत्रात जवानांना बाहेरून आणता येऊ शकतं किंवा तिथून बाहेर घेऊन जाता येऊ शकतं, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

  First published:

  Tags: China, India china, Ladakh, Uttarakhad