मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

भारताने LAC बाबत दिलेल्या 'या' कडक इशाऱ्यानंतर चीनची सबुरीची भूमिका

भारताने LAC बाबत दिलेल्या 'या' कडक इशाऱ्यानंतर चीनची सबुरीची भूमिका

शांतता ही एकतर्फी असून शकत नाही, असं भारतानं चीनला ठणकावल्यानंतर चीननं आता सबुरीची भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

शांतता ही एकतर्फी असून शकत नाही, असं भारतानं चीनला ठणकावल्यानंतर चीननं आता सबुरीची भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

शांतता ही एकतर्फी असून शकत नाही, असं भारतानं चीनला ठणकावल्यानंतर चीननं आता सबुरीची भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

  • Published by:  desk news

दुशांबे, 14 जुलै : भारत (India) आणि चीन (China) या दोन देशांमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (Actual line of control) घुसखोरीवरून सुरू असलेल्या वादात एक मोठी घटना घडली आहे. शांतता ही एकतर्फी असून शकत नाही, असं भारतानं चीनला ठणकावल्यानंतर चीननं आता सबुरीची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. शांघाय कॉर्पोरेशनच्या बैठकीत द्विपक्षीय चर्चेदरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी चिनी परराष्ट्रमंत्र्यांना भारताची भूमिका शांततेची असली तरी ती एकतर्फी असू शकत नाही, असं ठणकावलं.

शांघाय कॉर्पोरेशन आणि चर्चा

ताझिकीस्तानमध्ये आयोजित शांघाय कॉर्पोरेशनला भारत आणि चीन या दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री हजर होते. दोघांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील संघर्ष कसा कमी करता येईल आणि पुन्हा शांतता कशी प्रस्थापित येईल, याबाबत चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून सीमाभागात कुठल्याही कारवाया झाल्या नसून सैन्य एकमेकांना भिडल्याच्या केवळ अफवा असल्याचं दोन्ही बाजूंकडून जाहीर करण्यात आलं आहे.

स्थिती जैसे थे

दोन्ही देशांकडून सध्या status quo पाळला जात असून यापुढे कमांडर स्तरावर चर्चा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. फेब्रवारी महिन्यात चीननं ज्या प्रदेशातून माघार घेतली होती, त्या भागात ते पुन्हा आलेले नसल्याचं भारतीय सैन्यानं सांगितलं आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष झाल्याच्या चर्चा या फोल असून अशा प्रकारे कुठलीही घटना घडली नसल्याचं दोन्ही देशांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. चिनी सैन्यानं पुन्हा एकदा प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार केल्याच्या बातम्या माध्यमांत झळकल्या होत्या. मात्र त्यात कुठलंही तथ्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे वाचा -भारत नव्हे, आता हा देश ठरतोय आशियातला कोरोना हॉटस्पॉट

काय म्हणाले भारतीय परराष्ट्रमंत्री?

भारताने नेहमीच शांततेची भूमिका घेतली आहे. मात्र चीन अद्यापही छोट्या मोठ्या कुरबुरी करत असून शांतता प्रस्थापित करायची असेल, तर दोन्ही बाजूंनी सहकार्य मिळणं आवश्यक आहे. एका बाजूच्या शांततेला अर्थ नाही, असं भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना सांगितलं. त्यानंतर चीनने चर्चेचा सिलसिला पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेत कमांडर स्तरावरील चर्चेला सहमती दाखवली. भारतासाठी हा मोठा धोरणात्मक विजय मानला जात आहे.

First published:

Tags: China, India, India china