• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • चीनमध्ये चार दिवसात पडला वर्षभराचा पाऊस, एका तासात कहऱ, पाहा Video

चीनमध्ये चार दिवसात पडला वर्षभराचा पाऊस, एका तासात कहऱ, पाहा Video

चीनच्या झेंगझोव (Zhengzhou) भागात केवळ चार दिवसात (4 days) वर्षभराचा पाऊस (Whole year's rain) कोसळला आहे.

 • Share this:
  बिजिंग, 21 जुलै : चीनमध्ये निसर्गानं (Environment) आपलं रौद्र रुप दाखवायला सुरुवात केली आहे. चीनच्या झेंगझोव (Zhengzhou) भागात केवळ चार दिवसात (4 days) वर्षभराचा पाऊस (Whole year's rain) कोसळला आहे. त्यामुळे या परिसरात अक्षरशः पाणीच पाणी झालं असून अनेक नागरिक वेगवेगळ्या भागात अडकून पडले आहेत. पावसाचं नवं रेकॉर्ड चीनमध्ये गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असून पूर्ण वर्षभरात जितका पाऊस पडतो, तितका पाऊस गेल्या चार दिवसांत पडला आहे. तर वर्षभरातील एकूण पावसाच्या एक तृतीयांश पाऊस 20 जुलै या दिवशी केवळ एका तासात कोसळला आहे. निसर्गाचा समतोल बिघडल्याचं हे लक्षण असून या पावसामुळे अनेक प्रवासी मेट्रोच्या ट्यूबमध्ये म्हणजे बोगद्यातील स्थानकांवर अडकून पडले होते. सुखरूप सुटका चहूबाजूंनी पाण्याचा वेढा पडल्यामुळे मेट्रोनं प्रवास करणारे नागरिक अडकून पडले होते. अनेक ठिकाणी प्रवाशांच्या गळ्यापर्यंत पाणी चढलं होतं. मेट्रो तर पूर्ण पाण्यात गेल्याचं चित्र होतं. प्रवाशांना आहे त्याच ठिकाणी थांबून छतांवर आधार घेण्याची सूचना प्रशासनाकडून करण्यात येत होती. प्रचंड वेगाने कोसळणाऱ्या पावसामुळे आणि साठलेल्या पाण्यामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. प्रवाशांना बाहेर काढणं हे अत्यंत जिकीरीचं काम होतं. मात्र अखेर या सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आल्याची माहिती चीनच्या प्रशासनानं दिली आहे. समतोल बिघडल्याचे संकेत निसर्गाचा समतोल भविष्यात कधीतरी बिघडू शकतो, असं आपण म्हणत असतो. मात्र आता भविष्याचा प्रश्नच नसून हा समतोल बिघडल्याचं वर्तमानकाळातलं हे लक्षण आहे, असं ट्विट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी केलं आहे. एका तासात वर्षभराच्या एक तृतीयांश पाऊस कोसळणं, ही निसर्गानं दिलेली वॉर्निंग असून भविष्यातील निसर्गाच्या प्रकोपाची नांदीच असल्याची प्रतिक्रिया हवामान क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत.
  Published by:desk news
  First published: