जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'चिनी सैन्य भारतीय हद्दीत खरंच घुसलंय का? उत्तर द्या', राहुल गांधींचा सरकारला सवाल

'चिनी सैन्य भारतीय हद्दीत खरंच घुसलंय का? उत्तर द्या', राहुल गांधींचा सरकारला सवाल

'चिनी सैन्य भारतीय हद्दीत खरंच घुसलंय का? उत्तर द्या', राहुल गांधींचा सरकारला सवाल

डोकलाम वादानंतर पहिल्यांदाच चीनबरोबरच्या सीमेवर तणाव वाढलेला आहे. दोन्ही बाजूंच्या लष्करांनी सज्जतेचे नारे दिलेले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 03 जून : देशावर कोरोनाचं आणि च्रकीवादळाचं संकट असताना भारत-चीन सीमेवर तणावाचं वातावरण आहे. डोकलाम वादानंतर पहिल्यांदाच चीनबरोबरच्या सीमेवर तणाव वाढलेला आहे. दोन्ही बाजूंच्या लष्करांनी सज्जतेचे नारे दिलेले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही लडाख भागात संघर्ष वाढला असल्याचं सांगितले आहे. चीन लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेसह (LAC) पॅंगॉंग त्सो आणि गॅल्व्हन व्हॅलीजवळ वेगानं आपल्या सैन्याचा विस्तार करत आहेत. त्यामुळं चिनी सैन्य भारताबरोबर असलेला सीमावाद आणखी वाढवण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, भारतानेही गॅल्व्हन व्हॅलीत सैन्य वाढवलं आहे. दरम्यान चिनी सैन्य मोठ्या संख्येनं भारतात घुसल्याच्या बातम्या आल्यानंतर राहुल गांधी सरकारला सवाल केला आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करत, चिनी सैन्या भारतात खरंच घुसलं नाही आहे का? असा प्रश्न विचारला आहे. याआधी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंह यांनी तणाव वाढल्याचं सांगितलं होतं. वाचा- चीन खरंच मैत्री करण्याच्या लायकीचा देश आहे का? चीनबद्दलचा दृष्टिकोन सांगा

जाहिरात

दुसरीकडे, दोन्ही देशांमध्ये चर्चा झाल्यानंतरही आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. मंगळवारी दोन्ही देशांमधील विभागीय कमांडर पातळीवर बैठक झाली. या विषयावरील विभागीय कमांडर स्तराची ही तिसरी बैठक होती. यापूर्वी ब्रिगेडिअर आणि कर्नल रँक अधिकाऱ्यांनी चर्चा केली होती. मात्र सीमेवरचा तणाव वाढतच आहे. वाचा- लडाखमध्ये तणाव! डोकलामनंतर पहिल्यांदाच भारत-चीनमध्ये मोठ्या संघर्षाची शक्यता डोकलामपेक्षा दीर्घकाळ चालणार वाद 2017 मध्ये डोकलाम तिराहा प्रदेशात भारत आणि चीनच्या सैन्यांदरम्यान 73 दिवस चकमक सुरू होती. एवढेच नाही तर दोन्ही देशांमधील युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. भारत-चीन यांच्यात 3 हजार 488 किमी लांब वास्तविक नियंत्रण रेषेसह (LAC) आहे. मात्र या सीमेवरून गेली कित्येक वर्ष भारत आणि चीनमध्ये वाद आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिणेकडील तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे, तर भारतानं हा आपलाच अविभाज्य भाग असल्याचे म्हटलं आहे. भारत-चीन वादावर काय तुमचं मत View Survey

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात