नवी दिल्ली, 03 जून : एकीकडे संपूर्ण देश कोरोनासारख्या अदृश्य संकटाशी दोन हात करत असताना दुसरीकडे लडाखमध्ये मात्र तणावपूर्वक वातावरण आहे. चीन लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेसह (LAC) पॅंगॉंग त्सो आणि गॅल्व्हन व्हॅलीजवळ वेगानं आपल्या सैन्याचा विस्तार करत आहेत. त्यामुळं चिनी सैन्य भारताबरोबर असलेला सीमावाद आणखी वाढवण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, भारतानेही गॅल्व्हन व्हॅलीत सैन्य वाढवलं आहे. त्यामुळं जर भारत आणि चीन यांच्या संघर्ष झाला तर हा 2017मध्ये डोकलाम येथे झालेल्या संघर्षापेक्षा मोठ्या स्वरुपाचा असेल. उच्चस्तरीय लष्करी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतानं पॅंगॉंग त्सो आणि गॅल्व्हन व्हॅलीत आपलं सैन्य वाढवलं आहे. या दोन वादग्रस्त भागात चिनी सैन्याने दोन ते अडीच हजार सैनिक तैनात केलं आहे. चीन हळूहळू या भागात बंकर बनवण्याची तयारी करत आहे. भारतीय सैन्य विरोध करत असतानाच चीन घुसखोरी करत असल्याचं दिसत आहे. एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, गॅल्व्हन व्हॅलीतील दरबूक शाओक दौलत बेग ओल्डी रस्त्याजवळील भारतीय चौकी केएम-120च्या आसपास तसेच अनेक भागात चिनी सैन्य आहे. त्यामुळं भारतीय जवानांसाठी ही चिंतेची बाब आहे. तरी, या भागात चीनपेक्षा भारतीय सैन्य बऱ्याच चांगल्या स्थितीत आहे. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, सैन्य दलातील नॉर्दन कमांडचे माजी कमांडर निवृत्त लेफ्टनंट जनरल डी एस हुड्डा म्हणाले की, ‘ही गंभीर बाब आहे. हे सामान्य उल्लंघन नाही’. लेफ्टनंट जनरल हूडा यांनी असेही सांगितले की, गॅल्व्हन व्हॅलीबाबत दोन्ही देशांमध्ये कोणताही वाद नाही आहे, त्यामुळं चीननं केलेलं हे अतिक्रमण चिंतादायक आहे. काही दिवसांपूर्वी लडाखमध्ये दोन्ही देशांमध्ये चकमक झाली. भारतीय जवानांना ताब्यात घेतल्यानंतर मोठया प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. या चकमकीत दोन्ही बाजूचे 10 सैनिक जखमी झाले होते. दरम्यान, याबाबत राहुल गांधी यांनी सरकारनं हे प्रकरणं योग्य पद्धतीनं हाताळलं नसल्याचा आरोप केला आहे. तसेच सरकारनं जनतेला लडाखमधील परिस्थितीबाबत माहिती द्यावी, असेही ते राहुल गांधी म्हणाले.
#WATCH Details of the border issue, what happened and how, the government should tell the nation in a transparent manner because there is no clarity. What happened in Nepal and how, what is happening in Ladakh and how... there should be transparency: Rahul Gandhi pic.twitter.com/oc7CEoooKL
— ANI (@ANI) May 26, 2020
डोकलामपेक्षा दीर्घकाळ चालणार वाद 2017 मध्ये डोकलाम तिराहा प्रदेशात भारत आणि चीनच्या सैन्यांदरम्यान 73 दिवस चकमक सुरू होती. एवढेच नाही तर दोन्ही देशांमधील युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. भारत-चीन यांच्यात 3 हजार 488 किमी लांब वास्तविक नियंत्रण रेषेसह (LAC) आहे. मात्र या सीमेवरून गेली कित्येक वर्ष भारत आणि चीनमध्ये वाद आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिणेकडील तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे, तर भारतानं हा आपलाच अविभाज्य भाग असल्याचे म्हटलं आहे. भारत-चीन वादावर काय तुमचं मत View Survey संपादन, संकलन-प्रियांका गावडे.