नवी दिल्ली, 25 जानेवारी: भारतात प्रजासत्ताक दिन हा दरवर्षी मोठया उत्साहात साजरा केला जातो. वेगवेगळया राज्यांची पथके, प्रमुख पाहुणे तसेच मोठया संखेने प्रेक्षक ह्या परेड साठी हजेरी लावत असतात. मात्र यावर्षी कोविड – 19 ची गंभीर परिस्थिती लक्षात घेता सरकारने ह्यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेड मध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नक्की काय आहेत हे बदल जाणून घेऊया
प्रेक्षकांची उपस्थिती आणि ठिकाण: ह्यावर्षी प्रेक्षकांची संख्या ही कमी करण्यात आली आहे. जास्त गर्दी होऊ नये आणि सुरक्षित अंतर राखलं जावं यासाठी ह्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी एकूण 1 लाख 25 हजार प्रेक्षक हे परेड पाहण्यासाठी उपस्थित होते मात्र यावेळी ही संख्या कमी करून फक्त 25,000 करण्यात आली आहे. यावर्षी सर्वसाधारण सार्वजनिक तिकिटांची किंमत ही 4,500 रुपये इतकी सांगितली आहे. यावर्षी परेड ही नेहमीसारखी लाल किल्ल्यासामोरून मानवंदना देत जाणार नाही. परेडचं स्थान हे बदललं गेलं असुन ती राष्ट्रीय स्टेडियमवर होईल. तसेच परेडचा कालावधी सुद्धा कमी करण्यात आला आहे. प्रमुख पाहुणे नाहीत दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी मित्र राष्ट्रांना प्रमुख पाहुणे म्हणुन आमंत्रित केलं जातं. मात्र यावर्षी यात एक मोठा बदल केला गेला आहे. यावर्षीचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉनसन कोविड – 19 च्या साथीमुळे येऊ शकले नाहीत. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रमुख पाहुण्यांची अनुपस्थिती ही 55 वर्षांत प्रथमच होईल. यापूर्वी 1952, 1953 आणि 1966 मध्ये देखील कोणतेही प्रमुख पाहुणे परेडसाठी उपस्थित नव्हते. हे देखील वाचा - India-China Standoff: चीनचा डाव भारतीय सैनिकांनी पाडला हाणून, 20 चिनी सैनिक जखमी परेड पथक आणि सहभाग: दरवर्षी वेगवेगळया राज्यांची एकूण 144 ते 150 परेड पथके प्रजासत्ताक दिनी सहभागी होत असतात. मात्र यावर्षी फक्त 96 चं पथके ही परेड मार्च मध्ये सहभागी होतील. सुरक्षेच्या दृष्टीने दोन पथकांत अंतर ठेवता यावं म्हणुन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पथकांचे आकार देखील कमी केले गेले आहेत. प्रत्येक वर्षी सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारे मोटारसायकल स्टंट देखील यावर्षी होणार नाहीत. मानाच्या शौर्य पुरस्काराचे वितरण आणि पुरस्कार विजेत्यांचा सत्कार सोहळा देखील रद्द करण्यात आला आहे. मीडीयावरील निर्बंध: दरवर्षी मोठया प्रमाणात मीडिया ह्या सोहळ्याचं रिपोर्टिंग करत असतो. मात्र ह्यावेळी मीडियावर सुद्धा काही निर्बंध लादले गेलेत. मागील वर्षी 300 मीडिया प्रतिनिधींना आमंत्रित केले गेले होते. यावेळी ही मात्र संख्या 200 करण्यात आली आहे.