नवी दिल्ली, 25 जानेवारी : लडाखमध्ये लाईन ऑफ एक्चुएल कंट्रोलवर (LAC) तणावादरम्यान, सिक्किममध्ये भारत आणि चिनी सेनेत संघर्ष झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे ठिकाण 190000 फूट उंचावर आहे. तीन दिवसांपूर्वी घुसखोरीचा प्रयत्न झाला होता. नाथुलामध्ये (Nathu La) चिनी सेनेने यथास्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. तसंच भारतीय सीमेवर (Indian territory) काही चिनी सैनिक घुसखोरीच्या उद्देशाने येत होते. या दरम्यान भारतीय सेनेने कारवाई केल्याची माहिती आहे. भारतीय आणि चिनी सेनेत झालेल्या संघर्षात (Clash in Sikkim's Nathu La) 20 चिनी सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अद्याप दोन्ही देशांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे हवामानाची स्थिती बिकट असतानाही भारतीय हद्दीत सर्व ठिकाणी दक्षता राखली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, चिनी सेनेने पूर्व लडाखमधून आपले 10 हजार सैनिक हटवल्यानंतर, सिक्कीमच्या नाकूलामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.
Troops of India and China involved in a physical brawl along the Line of Actual Control (LAC) last week near Naku La area in Sikkim. Soldiers from both sides are injured. More details awaited: Sources pic.twitter.com/Sff5eVDP1K
दरम्यान, भारत-चीनमध्ये आतापर्यंत 9 वेळा बातचीत झाली आहे. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांचे नेते एकमेकांची भेट घेत आहेत. गेल्या वर्षी मे 2020 मध्ये एलएसीवर चिनी सेनेने कोरोना काळात अनेक ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली होती.