जाहिरात
मराठी बातम्या / देश / भारताचा चीनला आणखी मोठा दणका, 44 ट्रेन्सचं टेंडर रद्द

भारताचा चीनला आणखी मोठा दणका, 44 ट्रेन्सचं टेंडर रद्द

चीन काय करू शकतो याचा अंदाज घेत भारताने सर्व तयारी सुरु केल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे.

चीन काय करू शकतो याचा अंदाज घेत भारताने सर्व तयारी सुरु केल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे.

भारत आणि चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारताने अनेक निर्णय घेत चीनला आपला कडक विरोध दाखवून दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 22 ऑगस्ट: सीमा वादानंतर भारताने चीन विरोधात अनेक मोठे निर्णय घेत धक्के दिले आहे. भारताने आता आणखी एक दणका दिला असून 44 वंदे भारत ट्रेन्सचं टेंडर रद्द केलं आहे. काही भारतीय कंपन्यांनी चिनी कंपन्यांच्या मदतीने हे टेंडर्स टाकले होते ते सर्व टेंडर्स आता रद्द करण्यात आले आहेत. त्याचा चिनी कंपन्यांना चांगला फटका बसणार आहे. ‘वंदे भारत’ ट्रेन्स अंतर्गत या ट्रेन्स चालविण्यात येणार होत्या. मात्र आता हे टेंडर्स रद्द करून आता ते दुसऱ्या कंपन्यांना दिले जाणार आहेत. भारत आणि चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारताने अनेक निर्णय घेत चीनला आपला कडक विरोध दाखवून दिला आहे. चीन विरोधात भारतीय व्यापारी सर्वात मोठ निर्णय घेण्याच्या तयारीत असून येणाऱ्या सणा-सुदींच्या दिवसांना चिनी माल आयात करणार नसल्याचं The Confederation of All India Traders म्हणजेच CAIT ने म्हटलं आहे. CAIT ‘भारताचं सामान-आमचा अभिमान’ हे अभियान राबविणार असून त्यामुळे चीनला तब्बल 40 हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. Unlock 3:  प्रवासी आणि माल वाहतुकीवरचे निर्बंध उठवा, केंद्राने राज्यांना फटकारलं ऑगस्ट महिन्यांपासून भारतात विविध सणांना सुरुवात होते. रक्षाबंधन, गौरी-गणपती, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सणांच्या दिवसांमध्ये भारतीय बाजारपेठांमध्ये सगळ्यात जास्त खरेदी होते. गेल्या काही वर्षांमध्ये स्वस्त आणि आकर्षक असलेल्या चिनी मालांनी भारतीय बाजारपेठा काबीज केल्या होत्या. भारतीय व्यापारी हे चीनमधून हा माल आणत असल्याने भारतीय मालाला उठाव नव्हता. राम मंदिर, दिल्लीत होता घातपाताचा मोठा डाव, ISIS दहशतवाद्याची धक्कादायक माहिती आता सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आणि केंद्र सरकाने घेतलेल्या अनेक निर्णयामुळे चीनला दणका बसला आहे. त्यात पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला. त्यामुळे लोकांमध्येही चीन विरोधात भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे आता भारतीय उत्पादकांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात