जाहिरात
मराठी बातम्या / देश / राम मंदिर आणि दिल्लीत होता घातपाताचा मोठा डाव, ISIS दहशतवाद्याकडून धक्कादायक माहिती

राम मंदिर आणि दिल्लीत होता घातपाताचा मोठा डाव, ISIS दहशतवाद्याकडून धक्कादायक माहिती

राम मंदिर आणि दिल्लीत होता घातपाताचा मोठा डाव, ISIS दहशतवाद्याकडून धक्कादायक माहिती

चौकशीदरम्यान ISIS दहशतवाद्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : गणेशोत्सवादिवशी तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एकाचा खात्मा करण्यात आला आहे. दुसरं म्हणजे पंजाबमध्ये पाकिस्तानमधून घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या 5 जणांचा खात्मा करण्यात आला आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे दिल्लीत ISISचा दहशतवाद्याला बेड्या ठेकल्या असून त्याच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान ISIS दहशतवाद्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात राम मंदिर होत असलेल्या ठिकाणी घातपात करण्याचा मोठा डाव होता. अशी माहिती दहशतवादी अबू युसूफने दिली. अबू अफगाणिस्तानमधील काही साथीदारांच्या संपर्कातही होता. या दोन ठिकाणी मोठे हल्ले घडवून आणण्याचा डाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे.

जाहिरात

हे वाचा- मोठी बातमी, BSF कडून 5 पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा, 47 रायफली जप्त दिल्लीमध्ये शनिवारी गणेशोत्सवाचा उत्साह असताना चकमक सुरू होती. पोलिसांच्या विशेष पथकानं ISISच्या दहशतवाद्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून 4 जिवंत काडतूसं, दोन IED स्फोटकं आणि शस्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अब्दुल युसूफ असं या दहशतवाद्याचं नाव आहे. त्याच्याकडून 2 IED स्फोटकं ताब्यात घेण्यात आली आहेत. पोलीस आणि अब्दुल युसूफमध्ये चकमक झाली. 6 वेळा गोळीबार केल्यानंतर युसूफला पकडण्यात पोलिसांना यश मिळालं. पोलिसांनी IED स्फोटकं डिफ्यूज केली आहेत यासंदर्भात पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात