मुंबई, 14 ऑक्टोबर : भाजपनं दसऱ्यानिमित्त महाराष्ट्रातील मविआ सरकारच्या घोटाळ्यांचं दहन करण्याच्या कार्यक्रमाचं (BJP to burn MVA government corruption symbol) आयोजन केलं आहे. महाराष्ट्रातील घोटाळेबाज सरकारचा (BJP strike on MVA government) निषेध करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून दसऱ्याचं निमित्त साधत राज्य सरकारवर टीका करण्याची संधी भाजप साधणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मविआ सरकार आणि विशेषतः अजित पवारांच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत (Kirit Somaiyya on Ajit Pawar) सातत्यानं पाठपुरावा कऱणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.
मविआ सरकारवर निशाणा
भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारविरुद्ध आवाज उठवला जात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी करताना गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर अजित पवार यांची आणि त्यांच्याशी संबंधित सर्वांची आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. गेल्या सलग सात दिवसांपासून अजित पवारांशी संबंधित अनेकांच्या कार्यालयांवर धाडी पडत असून आतापर्यंत अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
हे वाचा -जिओचा सर्वांत स्वस्त 4G स्मार्टफोन, दिवाळीपूर्वी असू शकतो ग्राहकांच्या हातात
किरीट सोमय्यांनी लगावला टोला
अजित पवार यांच्याशी संबंधित गैरव्यवहाराबाबत सलग 7 दिवस धाडी पडत असून आतापर्यंत ही भारतातील सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी बुधवारी केला होता. पवारांच्या घोटाळ्यावर नेटफ्लिक्सची डॉक्युमेंटरी होऊ शकते, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला होता. पुण्यात पाहिल तिथे पवारांची संपत्ती असून प्रत्येक सातबारावर पवारांचंच नाव असल्याचं सोमय्या म्हणाले होते. पवारांनी जाहीर केलेली संपत्ती एवढी असेल, तर लपवलेली किती असेल, असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आता भाजपनं हाच विरोध पुढे नेत दसऱ्याचं निमित्त साधत राज्य सरकारच्या घोटाळ्यांचं दहन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मविआ सरकारला ठरवलं रावण
दसऱ्यादिवशी रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्याची पद्धत आहे. सध्या महाराष्ट्रातील जनतेसाठी राज्यातील घोटाळेबाज सरकार हाच रावण असल्याचा दावा भाजपनं केला आहे. या सरकारच्या घोटाळ्यांचं दहन करण्यासाठी सर्वांनी हजर राहण्याचं निवेदन भाजपनं केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Kirit Somaiya