मुंबई, 14 ऑक्टोबर : अनंत करमुसे मारहाण प्रकरणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक (Jitendra Awhad Arrested) करुन जामिनावर सोडण्यात आलं. अनंत करमुसे या व्यक्तीचं अपहरण करून मारहाण केल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कोर्टाने त्यांना तत्काळ जामिनदेखील दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेली कारवाई गुप्त ठेवण्यात आली होती. यासंदर्भात भाजप मंत्री किरीट सोमय्या यांनी ट्विट केलं होतं. अनंत करमुसे प्रकरण राज्यभरात गाजलं होतं. यानंतर आव्हाड यांच्यावर कारवाई केली जावी यासाठी मागणी करण्यात आली होती. मात्र जितेंद्र आव्हाड यांना अटक तर झाली मात्र जामीनदेखील तातडीने मिळाला यामुळे विरोध पक्षांकडून टीका केली जात आहे.
At Last Thackeray Sarkar's Minister Jitendra Awhad arrested on Anant Karmuse kidnapping & assault case.
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 14, 2021
अखेर ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झाली.@BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil
आव्हाडांवर काय आहे आरोप? जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी (Jitendra Awhad comment on Assaulting a Person) आपल्याला घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर तरुणाने केला केला होता. हे ही वाचा- ‘त्या’ आमदाराला घेऊन या थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही : चित्रा वाघ फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने या तरुणाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला होता.