मराठी बातम्या /बातम्या /देश /

India@75: या चळवळी व्यक्तिमत्त्वांमुळे जपली गेली भारताची हिरवाई! एकानं तर नाकारला होता पद्मश्री सन्मान

India@75: या चळवळी व्यक्तिमत्त्वांमुळे जपली गेली भारताची हिरवाई! एकानं तर नाकारला होता पद्मश्री सन्मान

Independence Day 2022: या व्यक्तींनी आपल्या आयुष्यात बदल घडवले. देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव (India@75) साजरा होत असताना या पर्यावरणवाद्यांचं - Change makers चं योगदान समजून घ्यायला हवं.

Independence Day 2022: या व्यक्तींनी आपल्या आयुष्यात बदल घडवले. देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव (India@75) साजरा होत असताना या पर्यावरणवाद्यांचं - Change makers चं योगदान समजून घ्यायला हवं.

Independence Day 2022: या व्यक्तींनी आपल्या आयुष्यात बदल घडवले. देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव (India@75) साजरा होत असताना या पर्यावरणवाद्यांचं - Change makers चं योगदान समजून घ्यायला हवं.

दिल्ली, 9 ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (India@75) सध्या सुरू आहे. आधी स्वातंत्र्यलढा, मग स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाचं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी, लोकशाहीनं देशाचा कारभार करण्यासाठी अनेक चळवळी, आदोलनं होत राहिली. देशहिताच्या गोष्टींमध्ये असलेलं पर्यावरणाचं स्थान हळूहळू सर्वांच्या लक्षात येऊ लागलं. त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण, संवर्धन करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावू लागले. त्यासाठीही चळवळी उभ्या राहिल्या. त्यात देशातल्या अनेकांनी सहभाग घेतला. देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव (Independence Day 2022) साजरा होत असताना या पर्यावरणवाद्यांचं योगदान समजून घ्यायला हवं. अठराव्या शतकापासून ते आजपर्यंत कोळसा आणि तेलाच्या प्रचंड वापरामुळे पृथ्वीचं तापमान जवळपास एक अंशाने वाढलं आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढ झाली. हवामानबदलाचा संपूर्ण सृष्टीला धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाचा सततचा ऱ्हास व नुकसान यामुळे जगापुढे अनेक आव्हानं निर्माण झाली व होत आहेत. एकविसाव्या शतकातला हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी पर्यावरण रक्षणाची चळवळ उभी राहिली आहे. भारतात या चळवळीमध्ये सक्रियतेनं सहभागी असलेलं आघाडीचं नाव सुंदरलाल बहुगुणा यांचं आहे. सुंदरलाल बहुगुणा सुंदरलाल बहुगुणा (Sunderlal Bahuguna) म्हटलं, की चिपको आंदोलन आठवतं. उत्तराखंडातल्या पर्यावरण चळवळीशी निगडीत हे महत्त्वाचं नाव आहे. हिमालयातल्या वनसंरक्षणासाठी सुंदरलाल बहुगुणा लढले. 1970 च्या दशकात चिपको आंदोलनाच्या (Chipko Movement) निमित्तानं ते पहिल्यांदा पर्यावरणाच्या चळवळीत आले. त्यानंतर 1980 पासून 2004 पर्यंत टिहरी धरण आंदोलनासाठी ते लढले. भारतातल्या आघाडीच्या पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. या आंदोलनांबरोबर हिमालयातल्या नागरिकांसाठी व देशातल्या नद्यांसाठी त्यांनी भरपूर काम केलं. डोंगराळ भागातल्या, विशेषतः महिलांच्या समस्या दूर करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. जातीयवादाविरुद्धच्या लढ्याबरोबरच इतर सामाजिक प्रश्नांसाठी ते लढले. महात्मा गांधींच्या प्रेरणेवरून त्यांनी हिमालयातल्या जंगलांमध्ये सुमारे 4700 किलोमीटरची पदयात्रा केली. भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला; मात्र त्यांनी पुरस्कार स्वीकारला नाही. राजेंद्रसिंह (जलपुरुष) भारतातल्या जल संवर्धनाच्या क्षेत्रात महत्त्वाचं योगदान असलेले राजेंद्रसिंह (Rajendra Singh) आज अनेकांना परिचित आहेत. त्यांना जलपुरुष ही ओळख यामुळेच मिळाली आहे. राजस्थानातलं अल्वर ही त्यांची कर्मभूमी. कोरड्या पडलेल्या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी प्रयत्न केले. आज देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून त्यांच्या कामाचा प्रसार ते करत आहेत. पाणी व्यवस्थापन व जलसंवर्धन याबाबत ते जनजागृतीचं मोठं काम करताहेत. सुनीता नारायण पर्यावरणाच्या क्षेत्रात सुनीता नारायण (Sunita Narayan) यांचं नाव आदरानं घेतलं जातं. सध्या त्या सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायर्न्मेंट या संस्थेच्या महासंचालक आहेत. तसंच ‘डाउन टू अर्थ’ या पाक्षिकाच्या संपादिका आहेत. पावसाचं पाणी साठवणं आणि सामुदायिक जल व्यवस्थापनासाठीचं (Water Managemant) धोरण तयार करण्यासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. पर्यावरणाविषयीच्या समस्या आणि समाजावर होणारे परिणाम याबाबत त्या अनेक दशकं काम करत आहेत. नागरिकांचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने पाणी, निसर्ग आणि पर्यावरणाविषयीच्या समस्या सोडवण्यासाठी त्या कार्यरत आहेत. पर्यावरण आणि मानवी जीवन यांचा मेळ साधून पर्यावरणाचं संवर्धन करता येऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. देशात वाघांचं अस्तित्व कमी होत असल्यामुळे व्याघ्रसंवर्धन (Tiger Conservation) मोहिमेसाठी त्यांनी काम केलं. तत्कालीन पंतप्रधानांच्या सूचनेवरून 2005 मध्ये टायगर टास्क फोर्सच्या त्या अध्यक्षा झाल्या. नक्षल चळवळ, सरकारी भ्रष्टाचार, वाघ व झाडांचं संवर्धन, तसंच इतर सामाजिक मुद्द्यांबाबत त्यांनी वेळोवेळी भूमिका मांडली आहे. 2005मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. अनुपम मिश्रा गांधीवादी विचारांनी प्रेरित पत्रकार, लेखक, पर्यावरणवादी आणि जलरक्षण मोहिमेचे कार्यकर्ते म्हणून अनुपम मिश्रा (Anupam Mishra) यांची ओळख आहे. पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं. सरकारमध्ये पर्यावरणाच्या रक्षणासंदर्भात एकही विभाग नसताना या विषयाकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राजस्थानातल्या दुष्काळी भागातल्या अल्वर या गावात त्यांनी केलेल्या जलसंवर्धनाच्या (Water Conservation) कामामुळे साऱ्या जगाचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. पाणी वाचवण्याच्या पारंपरिक उपायांबाबत गावागावात फिरून त्यांनी जनजागृती केली. अल्वर गावात कोरड्या पडलेल्या अरवरी नदीच्या पुनरुज्जीवनात (Rejuvenation) त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. हे वाचा -  ndia@75 : ब्रिटीशांची झोप उडवणाऱ्या ‘या’ 5 महिलांचं कार्य देश कधीच विसरू शकणार नाही उत्तराखंड व राजस्थानातील लापोडिया भागातल्या पाण्याच्या पारंपरिक स्रोतांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी त्यांनी भरपूर काम केलं आहे. ‘आज भी खरे है तालाब’ आणि ‘रजत ड्रॉप्स ऑफ राजस्थान’ ही त्यांची पुस्तकं जलसंवर्धनाच्या क्षेत्रातली मैलाचा दगड मानली जातात. देशातल्या विविध भागांत राहणाऱ्या नागरिकांनी त्या ठिकाणच्या भौगोलिक रचना व उपलब्ध स्रोत व गरजांनुसार जलसंवर्धनाच्या विविध पद्धती कशा अंगीकारल्या आहेत याबाबत ते देशात व परदेशातही सांगत असतात. त्यांना ‘इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार’ हा देशातला पर्यावरणाबाबतचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला आहे. मरिमुथू योगनाथन मरिमुथू योगनाथन (Marimuthu Yoganathan) यांना ट्री मॅन म्हणून ओळखलं जातं. तसंच हरित योद्धा अशीही त्यांची ओळख आहे. तमिळनाडूच्या राज्य परिवहन मंडळात बस वाहक म्हणून त्यांनी काम केलंय. त्याशिवाय पर्यावरणाच्या चळवळीसाठीही काम करत आहेत. राज्यात 3 लाख रोपं लावण्याच्या त्यांच्या कामाची दखल टिंबरलँड या अमेरिकन फूटवेअर कंपनीनं घेतली. पर्यावरणाच्या संवर्धानाविषयी विद्यार्थ्यांमध्येही त्यांनी जागृती केली. त्यासाठी आजवर त्यांनी 3743 विद्यापीठांना, शाळांना, महाविद्यालयांना, तसंच उद्योगांना भेटी दिल्या आहेत. त्यांच्या “Uirwaza Oru Marn” या प्रकल्पासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला आहे. विद्यार्थ्यांनी वाढदिवसाला एक रोप लावावं, असं या प्रकल्पात त्यांनी सांगितलं होतं. उपराष्ट्रपतींकडून त्यांना ‘इकोवॉरिअर’ हा पुरस्कार देऊन गोरवण्यात आलंय.
First published:

Tags: Achievements@75, Best of Bharat, Changemakers, Independence day

पुढील बातम्या