जाहिरात
मराठी बातम्या / देश / इतिहासात पहिल्यांदाच वाघा बॉर्डरवरचं संचलन प्रेक्षकांविना; तरीही जवानांची सलामी तितकीच कडक! पाहा VIDEO

इतिहासात पहिल्यांदाच वाघा बॉर्डरवरचं संचलन प्रेक्षकांविना; तरीही जवानांची सलामी तितकीच कडक! पाहा VIDEO

इतिहासात पहिल्यांदाच वाघा बॉर्डरवरचं संचलन प्रेक्षकांविना; तरीही जवानांची सलामी तितकीच कडक! पाहा VIDEO

गेल्या 61 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence day 2020) होणाऱ्या वाघा-अट्टारी (Attari-Wagah Border) सीमेवर होणाऱ्या प्रेक्षणीय संचलनाला (Beating retreat ceremony) प्रेक्षकच उपस्थित नव्हते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : गेल्या 61 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence day 2020) होणाऱ्या वाघा-अट्टारी (Attari-Wagah Border) सीमेवर होणाऱ्या प्रेक्षणीय संचलनाला (Beating retreat ceremony) प्रेक्षकच उपस्थित नव्हते. Coronavirus च्या पार्श्वभूमीवर वाघा सीमेवर पर्यटकांना प्रतिबंध आहे. एकत्र येऊन कुठलाही समारंभ किंवा कार्यक्रम साजरा करण्यावर बंदी आहे. त्यामुळेच पाकिस्तान सीमेवरचा आजचा 15 ऑगस्टचा सैनिकांचा कार्यक्रम प्रेक्षकांविनाच झाला. तरीही जवानांचा जोश तेवढाच होता. भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या वाघा अट्टारी सीमेवर दररोजच संचलन होतं. हे Change of guard पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक आणि देशभक्त हजेरी लावतात. BSF आणि पाकिस्तान रेंजर्सचे जवान दोन देशांमधल्या सीमेजवळच्या चेकपोस्टवर हे संचलन करतात. अमृतसरपासून 30 किलोमीटरवर असणाऱ्या या चेकपोस्टवर हे जोशपूर्ण आणि प्रेक्षणीय संचलन पाहायला दरवर्षी प्रचंड गर्दी असते. या वर्षी मात्र कोविडच्या धास्तीमुळे हे संचलन प्रेक्षकांविना झालं.

जाहिरात

ध्वजारोहण, ड्रिल आणि त्यानंतर बीटिंग द रीट्रिटचं खास संचलन 74 व्या स्वातंत्र्यदिनाला ओकंबोकं होतं. वाघा बॉर्डरवर यापूर्वी संचलन पाहिलेल्या लोकांना तो रोमांचकारी अनुभव कायम स्मरणात राहणारा असतो. हे वाचा मोदींबरोबर ‘वंदे मातरम’ नाही म्हणाले मुख्यमंत्री; केजरीवाल झाले ट्रोल यावर्षी संचलनात जोश होता पण प्रेक्षकांअभावी आणि त्यांच्या प्रोत्साहनाअभावी जान नव्हती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात