मोदींबरोबर 'वंदे मातरम' नाही म्हणाले मुख्यमंत्री; VIDEO व्हायरल झाल्यावर केजरीवाल ट्रोल

मोदींबरोबर 'वंदे मातरम' नाही म्हणाले मुख्यमंत्री; VIDEO व्हायरल झाल्यावर केजरीवाल ट्रोल

दोन्ही हात उंचावून वंदे मातरम म्हणा असं आवाहन त्यांनी केल्यावर उपस्थित जनसमुदायानेदेखील वंदे मातरमचे नारे दिले. अपवाद फक्त या मुख्यमंत्र्यांचा.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दिल्लीत लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन करताना नरेंद्र मोदींनी शेवटी वंदे मातरमचा जयघोष केला. दोन्ही हात उंचावून वंदे मातरम म्हणा असं आवाहन त्यांनी केल्यावर उपस्थित जनसमुदायानेदेखील वंदे मातरमचे नारे दिले. पण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र शांत राहिला. आता लाल किल्ल्यावरच्या भाषणाचा हा VIDEO VIRAL झाला आहे. भाजप समर्थकांकडून केजरीवाल जोरदार ट्रोल होत आहेत.

केजरीवाल यांचं वर्तन अत्यंत हीन आणि लज्जास्पद आहे, असं लिहून अनेकांनी शेम शेमचे हॅशटॅग केजरीवालांविरोधात लिहिले आहेत.

Shame on you @ArvindKejriwal

वंदे मातरम ना बोलना - घटिया व शर्मनाक

15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार भाषण केलं. भाषण संपताना त्यांनी उपस्थित समुदायाला उद्देशून वंदे मातरमची घोषणा केली. माझ्या मागून हात वर करून म्हणा, वंदे मातरम, असं आवाहन मोदींनी केलं. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये केजरीवाल वंदे मातरमच्या घोषणा देत नाहीत हे स्पष्ट दिसत आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 15, 2020, 9:00 PM IST

ताज्या बातम्या