नवी दिल्ली 20 जानेवारी : भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये नागरिकांच्या प्रवासाच्या सोयीसाठी रेल्वेचं विस्तीर्ण जाळं तयार करण्यात आलेलं आहे. भारतीय रेल्वे देशाच्या
(Indian Railways) कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहचली आहे. आजही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिक रेल्वेला प्राधान्य देतात. विशेषत: जे लोक नियमितपणे लांबचा प्रवास करतात, त्यांची पहिली पसंती रेल्वेलाच मिळते. कारण, रेल्वेच्या माध्यमातून कमी दरात आरामदायी प्रवास करता येतो. मात्र, रेल्वेच्या इतिहासात दोन-तीन घटना अशादेखील घडल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांना विनाकारण स्टेशनवर अडकून पडावं लागलं होतं.
एकदा तर मालगाडी (Freight train) आठ तास एकाच स्टेशनवर थांबवली गेली होती. रेल्वेच्या वेळापत्रकाचा विचार केल्यास एखादी ट्रेन तासभर लेट
(Train Delay) होऊ शकते किंवा काही तांत्रिक बिघाड झाला असेल तर जास्तीत जास्त दोन तास लेट होऊ शकते. पण, एखादी ट्रेन
(Train) आठ तास लेट होण्यासारखं काय घडलं होतं? असा प्रश्न मनामध्ये येणं साहजिक आहे. रेल्वे आठ तास लेट होण्यास लोको पायलटचा
(Loco Pilot) विसरभोळेपणा कारणीभूत होता! भारतीय रेल्वेचा इतिहास पाहिल्यास, आतापर्यंत दोन ते तीन वेळा लोको पायलटकडून ट्रेनची
(Train Keys) चावी हरवलेली आहे. झी न्यूजनं याबाबत वृत्त दिलेलं आहे.
विसरभोळेपणा हा गुण माणसामध्ये असतोच. आपल्यापैकी प्रत्येकानं याचा कधीनाकधी अनुभव घेतलेला असेल. या मानवी स्वभावाचे बळी ट्रेनचे लोको पायलटदेखील ठरलेले आहेत. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील सतना रेल्वे स्टेशनवर
(MP Satana Railway Station) एक घटना घडली होती. या स्टेशनवर एका पॅसेंजर ट्रेनची
(MEMU) चावी हरवली होती. इंजिनची चावी हरवल्याचं अधिकाऱ्यांना समजताच एकच खळबळ उडाली होती. चावी शोधण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी (Railway staff) यार्डात धावपळ केली. मात्र, अनेक तासांच्या प्रयत्नानंतरही चावी सापडली नाही. शेवटी अगोदरचं इंजिन काढून नवीन इलेक्ट्रिक इंजिन जोडून ती ट्रेन रवाना करण्यात आली. मेमू ट्रेनमध्ये स्वतंत्र इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह
(Electric locomotive) बसवण्याची ती पहिलीच वेळ होती.
2018 मध्ये अशीच एक घटना समोर आली होती. मथुरेहून रेवाडीला जाणारी एक मालगाडी बावल स्टेशनवर
(Bawal Station) काही तास थांबली होती. या स्टेशनवर लोको पायलट (Loco Pilot) आणि गार्ड (Guard) बदलण्यात येणार होते. यामुळे गाडी काहीवेळ स्टेशनवर उभी होती. आपली ड्युटी सुरू झाल्यानं नवीन लोको पायलट आणि गार्ड ट्रेनमध्ये जाण्यासाठी निघाले. रेवाडीहून आलेल्या या रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्टेशन मास्तरकडे (Station Master) इंजिनची चावी मागितली असता ती सापडलीच नाही. खूप शोध घेतल्यानंतरही चावी सापडली नाही. त्यामुळे शेवटी ड्युटी संपलेल्या लोको पायलट आणि गार्डशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशीही संपर्क झाला नाही. चावी शोधण्याच्या या संपूर्ण गोंधळात मालगाडीला 8 तासांहून अधिक वेळ स्टेशनवरच उभं करावं लागलं होतं. त्यामुळे स्टेशनजवळ असणाऱ्या फाटकावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यादरम्यान, जयपूरहून दुसरी चावी मागवण्यात आली. त्यानंतर ट्रेन रवाना करण्यात आली.
दोन्ही घटना वाचण्यासाठी आपल्याला मजेशीर वाटतात. मात्र, त्यावेळी स्टेशनवर अधिकारी आणि प्रवाशांमध्ये काय गोंधळ उडाला असेल याची कल्पना न केलेलीचं बरी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.