नावात काय आहे? पण 'कोरोना' नाव असण्याचा झाला या दुकानाला फायदा

नावात काय आहे? पण 'कोरोना' नाव असण्याचा झाला या दुकानाला फायदा

शेक्सपिअर असं म्हणून गेला आहे की, नावात काय आहे. पण केरळमध्ये एका दुकानाचं नाव वाचून तुम्हाला असं वाटेल की नावात सर्वकाही आहे

  • Share this:

मुवत्तूपुझा (केरळ), 17  मार्च : शेक्सपिअर असं म्हणून गेला आहे की, नावात काय आहे. पण केरळमध्ये एका दुकानाचं नाव वाचून तुम्हाला असं वाटेल की नावात सर्वकाही आहे. याच नावामुळे हे दुकान अधिक प्रसिद्ध झाले आहे. सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) जगभरात धुमाकूळ घालत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. त्याच दरम्यान केरळमधील एक दुकान प्रसिद्धी झोतात आले आहे. कारण या दुकानाचं नाव 'कोरोना' आहे. हो, तुम्ही वाचलं ते अगदी बरोबर आहे.

(हे वाचा- कोरोनामुळे घरात बंदिस्त लोकांचा Video एकदा पाहा; जॅकलिन, कतरिनाचा वर्कआऊट विसराल)

कोची शहरापासून 40 किलोमीटर दूर अंतरावर हे रेडिमेड कपड्याचं दुकान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे दुकान त्याठिकाणी आहे. मात्र कोरोना व्हायरस जगभरात प्रामुख्याने भारतात पसरल्यानंतर हे दुकान अधिक प्रसिद्ध झाले आहे. आयएनएसशी बोलताना दुकानाचे मालक म्हणाले की, 'आता खूप लोकं दुकानाजवळ येऊन सेल्फी घेतात. काहीजण माझ्याकडे पाहून हसतात सुद्धा. गाडीतून जर कुणी जात असेल, तर नाव वाचून ते हैराण होऊन जातात. अनेक जण गाडी थांबवून दुकानाचं नाव वाचत राहतात.'

(हे वाचा-VIDEO : एक महिना रुग्णांसोबत होती नर्स, घरी आल्यावर माय-लेकाला अश्रू अनावर)

जेव्हा त्यांना विचारण्यात आले की तुम्ही दुकानाचं नाव असं का ठेवलं तेव्हा दुकानमालकांनी उत्तर दिलं की, 'मी डिक्शनरीमध्ये हा शब्द वाचला. वाचताच हा शब्द मला एकदम वेगळा वाटला त्यामुळे मी दुकानाला सुद्धा तेच नाव दिलं.' कपड्यांच्या दुकानाव्यतिरिक्त त्यांचा शिवणकामाचा सुद्धा व्यवसाय आहे. या दुकानाचा फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.

(हे वाचा-आईसोबत नदी पार करताना पाण्यात बुडला बछडा, पुढे काय झालं पाहा VIDEO)

कोरोना दुकानाच्या मालकांनी सुद्धा कोरोना व्हायरस संदर्भात खबरदारी बाळगायला सुरूवात केली आहे. ते दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आधी सॅनिटायझर देतात आणि मगच खरेदी करण्यास सांगत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2020 08:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading