कर्नाटकनंतर काँग्रेसला गोव्यात देखील धक्का; 10 आमदारांचा भाजपात प्रवेश

कर्नाटकनंतर काँग्रेसला गोव्यात देखील धक्का; 10 आमदारांचा भाजपात प्रवेश

गोव्यात देखील कर्नाटकप्रमाणे राजकीय उलथापालथ पाहायाला मिळत आहे.

  • Share this:

पणजी, 11 जुलै : कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या 11 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आता गोव्यात देखील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या 10 आमदारांनी विरोधीपक्ष नेत्यासह मिळून आपला वेगळा गट केला आहे. केंद्रीय नेतृत्वावर नाराज होऊन या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. भाजपमध्ये सहभागी होताना या आमदारांनी कोणतीही अट ठेवलेली नाही. गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील काँग्रेसच्या 10 आमदारांच्या प्रवेशाची पुष्टी केली आहे. या आमदारांच्या प्रवेशामुळे भाजपचं संख्याबळ आता 27 झालं आहे. गुरूवारी अर्थात 18 जुलै रोजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा करणात आहेत. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपवासी झालेले आमदार दिल्लीमध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्षे जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

विरोधीपक्ष नेताच भाजपच्या गळाला

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रप्रमाणे गोव्यामध्ये देखील भाजपच्या गळाला विरोधीपक्ष नेता लागला आहे. कारण, विरोधीपक्ष नेता चंद्रकांत कावळेकर यांनी देखील या दहा आमदारंसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी केलेल्या विकास कामांचा विचार करून आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती यावेळी प्रमोद कावळेकर यांनी दिली.

गोव्यातील समीकरण बदललं

काँग्रेसच्या 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं आता गोव्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. काँग्रेसचं संख्याबळ 15 वरून आता 5 झालं आहे. तर, भाजपचं संख्याबळ आता 27 झालं आहे. शिवाय, गोवा फॉरवर्ड पार्टी 3, महाराष्ट्र गोमांतक पार्टी 1, एनसीपी – 1 आणि अपक्ष 1 असं संख्याबळ गोव्यामध्ये पाहायाला मिळत आहे. यापूर्वी गोव्यात सत्ता स्थापनेवरून देखील मोठा राजकीय वाद झाला होता.

VIDEO: कट्टर शत्रू असलेल्या साप-मुंगसाच्या लढाईचा थरार कॅमेऱ्यात कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 09:36 AM IST

ताज्या बातम्या