पणजी, 12 डिसेंबर : गोव्यात (Goa News) गेल्या आठवड्यात टोमॅटोची किंमत बियरपेक्षा महाग असल्याचं वृत्त समोर आलं आहे. लोकप्रिय गोवा किंग्स पिल्सनरची किंमत 60 रुपए आहे. तर एक किलो टोमॅटोची किंमत 100 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. अवकाळी पावसामुळे टोमॅटोची (Tomato Prize) किंमत अधिक वाढली आहे.
गोव्यात दारूच्या किंमती मात्र स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. काही ठिकाणी टोमॅटोच्या किंमती 70 रुपये किलोपर्यंत विकलं जात आहे. याबाबत एका दुकानदाराने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, हे अत्यंत निराशाजनक आहे. चिली फ्राय आणि ऑमलेटमधून टोमॅटो गायब झाला आहे. जे टोमॅटो खरेदी करतात त्याचं प्रमाणही खूप कमी आहे. लवकरच टोमॅटोच्या किंमती कमी होतील अशी आशा आहे. 750 मिलीलीटर किंगफिशरदेखील टोमॅटोहून स्वस्त असल्याचं सांगितलं जात आहे.
एकीकडे पेट्रोल आणि डिजेलच्या किंमती वाढत आहे. तर दुसरीकडे भाजीपाल्याच्या किंमती वाढत आहे. गोव्यात अल्कोहोलवर सर्वात कमी टॅक्स लागतं, ज्यामुळे येथे दारूच्या किंमती देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कमी असतता. गोव्यात भाजी व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की, येणाऱ्या 15 ते 20 दिवसात टोमॅटोची किंमत कमी होऊ शकते.
हे ही वाचा-तळीरामांसाठी खुशखबर, राज्यात दारू झाली स्वस्त, असे आहे नवे दर!
देशातील दुसऱ्या राज्यात गेल्या महिन्यात टोमॅटोची किंमत 150 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली होती. आता हळू हळू याच्या किंमती कमी होत आहे. देशाची राजधानी नवी दिल्लीत शनिवारी 10 डिसेंबर रोजी टोमॅटोची किंमत 52 रुपये किलो होती, जी नोव्हेंबर महिन्या 60 ते 80 पर्यंत पोहोचली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beer, Goa, Goa Election 2021