Home /News /mumbai /

तळीरामांसाठी खुशखबर, राज्यात दारू झाली स्वस्त, असे आहे नवे दर!

तळीरामांसाठी खुशखबर, राज्यात दारू झाली स्वस्त, असे आहे नवे दर!

या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार याची तळीराम चातकाप्रमाणे वाट पाहत होते. अखेरीस उत्पादन शुल्क विभागाने नवे दर जाहीर केले आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार याची तळीराम चातकाप्रमाणे वाट पाहत होते. अखेरीस उत्पादन शुल्क विभागाने नवे दर जाहीर केले आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार याची तळीराम चातकाप्रमाणे वाट पाहत होते. अखेरीस उत्पादन शुल्क विभागाने नवे दर जाहीर केले आहे.

    मुंबई, 11 डिसेंबर : राज्यात आयात करण्यात येणारे परदेशी दारूच्या दरामध्ये (scotch whisky ) तब्बल 50 टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने (maharashtra government) घेतला होता. पण, या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार याची तळीराम चातकाप्रमाणे वाट पाहत होते. अखेरीस उत्पादन शुल्क विभागाने नवे दर जाहीर केले आहे. राज्यात आयात करणाऱ्या दारूवर (scotch whisky ) उत्पादन शुल्क तब्बल 50 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने 18 नोव्हेंबर रोजी घेतला होता. राज्य सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार, आजपासून हे दर कमी करण्यात आले आहे. आयात करण्यात आलेल्या स्कॉचवरील उत्पादन शुल्क 50 टक्के कमी केले आहे. MIM च्या शेकडो कार्यकर्त्यांकडून टोल घेतलाच नाही, सर्वसामान्यांसाठी वेगळा न्याय? या निर्णयामुळे इतर राज्यात असलेल्या दारूच्या किंमती राज्यातली किंमती एक समान असणार आहे. त्यामुळे आता राज्यात आधी महाग असलेले विदेश मद्य आता कमी दरात मिळणार आहे. सध्या एकूण 8 प्रकारच्या दारूच्या दरात कपात करण्यात आली आहे. इतर कंपन्याही आपले दर लवकरच जाहीर करतील. नवीन दरानुसार, जॉनी वॉकर ब्लॅक लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की ही आधी ५७६० रुपयांना मिळत होती. आता नवीन दरानुसार  ३७५० रुपयांना मिळणार आहे. जॉनी वॉकर रेड लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की (Johnny Walker Red Label Blended Scotch Whiskey) ही जुन्या दरानुसार ३०६० रुपयांना मिळत होती आता नवीन दरानुसार १९५० रुपयांना मिळणार आहे. जे ॲण्ड बी रेअर ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्कीचे (j&b rare blended scotch whiskey) आधीचे दर हे ३०६० रुपये होते आता २१०० रुपयांना ही दारू मिळणार आहे. ब्लॅन्टाइन्स (ballantine whisky) फाइनेस्ट ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्कीही आधी ३०७५ रुपयांना मिळत होती ती आता नवीन दरानुसार २१०० रुपयांना मिळणार आहे. शिवास रिगल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की ही ५८५० रुपयांना आधी मिळत होती, आता नवीन दरानुसार ३८५० रुपयांना मिळणार आहे. जॉर्डन्स लंडन ड्राय जीन २४०० जुने दर होते, आता नवीन दरानुसार १६५० रुपयांना मिळणार आहे. का घेतला निर्णय? राज्यात अनेक प्रकारचे मद्य हे आयात होत असतात. स्कॉच प्रकारच्या दारूतून राज्याला मोठा महसूल मिळतो. राज्य सरकारला स्कॉचच्या विक्रीतून वर्षाला 100 कोटींचा महसूल मिळत असतो. या कपातीतून आता राज्याच्या महसुलामध्ये वाढ होणार आहे. राज्याचा महसूल आता 250 कोटी रुपये वार्षिक होण्याची अपेक्षा आहे. किंमत कमी झाल्यामुळे बाटल्यांची विक्री वाढण्याची शक्यता आहे. एक लाख बाटल्यांच्या विक्रीचे प्रमाण आता 2.5 लाखांपर्यंत वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या अद्वयने 8व्या वर्षी इतिहास घडवला, दिग्गज बुद्धीबळपटूही चेकमेट किंमती जास्त असल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात बनावट दारूच्या विक्रीचा सुळसुळाट वाढला होता. त्यामुळे या विक्रीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयामुळे दारु तस्करीला आळा बसणार आहे.
    First published:

    पुढील बातम्या