मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शरद पवारांवर टीका पडळकरांना पडली महाग, धनगर समितीने दिला दणका

शरद पवारांवर टीका पडळकरांना पडली महाग, धनगर समितीने दिला दणका


गोपीचंद पडळकर यांच्या बेताल वक्तव्यामुळे धनगर समाजाची मानहानी झाली आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या बेताल वक्तव्यामुळे धनगर समाजाची मानहानी झाली आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या बेताल वक्तव्यामुळे धनगर समाजाची मानहानी झाली आहे.

पंढरपूर, 26 जून : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या विधानाचे राज्यात सर्वत्र पडसाद उमटले.   आता धनगर आरक्षण समितीतून गोपीचंद  पडळकर यांना बाजूला करण्यात आले आहे.

आज सकाळी वेळापूर येथे धनगर समाज कार्यकर्त्यांची बैठक झाली. धनगर समाजातील नेत्यांनी ही आमदार पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या धनगर  समाजाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय धनगर आरक्षण लढ्याचे मुख्य प्रवर्तक उत्तम जानकर यांनी घेतला आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या बेताल वक्तव्यामुळे धनगर समाजाची मानहानी झाली आहे. शिवाय आरक्षणाचा मुद्दा ही बाजूला गेला आहे. त्यामुळे अशा बेताल व्यक्त करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या  पडळकर यांना यापुढे आरक्षण लढ्यात कुठे सहभागी करून घेतले जाणार नसल्याचंही यावेळी जानकर यांनी जाहीर केले.

पडळकरांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी 25 जून रोजी शहर पोलीस स्टेशनला गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती. 'जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत पोलीस स्टेशनवर ठिय्या मांडणार', असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. अखेर पोलिसांकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पडळकर यांच्यावर 505(2)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अमर धुमाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.

काय म्हणाले होते पडळकर?

'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. राज्याचे नेतृत्त्व त्यांनी केले पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कडे कोणतीही विचारधारा नाही.  फक्त छोट्या छोट्या समाजाना भडकवायचे आणि त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि अन्याय करायचा एवढेच काम पवार करत आहेत' अशी जहरी टीका गोपीचंद पडळकरांनी  केली होती.

संपादन - सचिन साळवे

First published: