कोविडचा आढावा घेण्यासाठी सुरु होती बैठक, उपमुख्यमंत्री बोलत असतांनाच नाकातून आलं रक्त

कोविडचा आढावा घेण्यासाठी सुरु होती बैठक, उपमुख्यमंत्री बोलत असतांनाच नाकातून आलं रक्त

बैठक सुरु असतांनाच उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्या नाकातून रक्त येण्यास सुरुवात झाली त्यामुळे सगळेच अधिकारी घाबरले.

  • Share this:

आग्रा 10 ऑगस्ट: उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये युद्ध स्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत. याच प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा (Deputy CM Dr Dinesh Sharma) यांनी बैठक बोलावली होती. बैठक सुरु असतांनाच त्यांच्या नाकामधून रक्त येऊ लागलं. डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांनी शर्मा यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

उपमुख्यमंत्री शर्मा यांनी जिल्ह्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी सक्रिट हाऊसवर बैठक बोलावली होती. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व जण हजर होते. बैठक सुरु असतांनाच उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्या नाकातून रक्त येण्यास सुरुवात झाली त्यामुळे सगळेच अधिकारी घाबरले.

तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं. डॉक्टरांनी शर्मा यांची तपासणी केली. त्यानंतर काळजीचं कारण नसल्याचं त्यांनी सांगितलं. काही वेळातच त्यांना बरं वाटल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शर्मा यांचं ब्लड प्रेशर आणि इतर गोष्टी सामान्य आहेत अशी माहितीही डॉक्टरांनी दिली.

निधन झालेल्या वडिलांना एकदा पाहू द्या! मुलगा विनवणी करत होता, मागितले 51 हजार

नाक कोरडं पडल्याने रक्त आलं असावं अशी शक्यताही डॉक्टरांनी व्यक्त केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री शर्मा यांनी बैठक पूर्ण केली आणि लोकप्रतिनिधींशींही चर्चा केली. त्यानंतर ते पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले.

उत्तरप्रदेशात अनेक लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झालेली आहे. योगी सरकारमधल्या कॅबिनेट मंत्री रानी वरुण यांचा कोरोनामुळेच मृत्यू झाला होता. राज्य सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी विशेष टीम्स तयार केल्या असून त्यात तज्ज्ञ डॉक्टरांचाही समावेश आहे.

उत्त प्रदेशची लोकसंख्या पाहता तिथे जास्त धोका असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार अनेक उपाय योजनांवर काम करत  आहे.

दरम्यान, कोरोनाची लस 2021 वर्षाच्या सुरुवातील येईल असा जागतिक आरोग्य संघटनेचा दावा आहे. कोरोनाची लशी तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात असल्यानं ही लस तयार आहे असं म्हणता येणार नाही. कारण अजूनही मानवी चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण व्हायचा आहे. असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

वाद चिघळणार! सुशांतचा भाऊ ठोकणार संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा

सर्वांना प्रतीक्षा आहे ती ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनं तयार केलेल्या लशीची. त्यावरील क्लिनिकल चाचण्या वेगवेगळ्या देशांमध्ये सुरू आहेत. ऑक्सफोर्ड प्रोजेक्टमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भागीदार आहे. कोरोना लशीवर प्रथम काम सुरू करणार्‍या अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने पहिल्या दोन टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या पूर्ण केल्या आहेत, ज्याचे चांगले परिणाम मिळाले आहेत. याची तिसरी चाचणी 27 जुलैपासून सुरू झाली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 10, 2020, 8:23 PM IST

ताज्या बातम्या