कोलकाता 10 ऑगस्ट: कोरोनामुळे समाजाचीही घडी विस्कटून गेली आहे. अनेक जण जवळ आलेत तर अनेक जण दूरही गेलेत. एकमेकांना मदत करण्याच्या घटना जशा समोर आल्यात तश्याच प्रकारे काही अस्वस्थ करणाऱ्या आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनाही समोर आल्या आहेत. पश्चिम बंगालमधल्या एका हॉस्पिटलमध्ये कोरोनाने एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्या नागरिकाच्या मुलाकडे 51 हजार रुपयांची मागणी केल्याची संतापजनक घटना घडली आहे. कोविडची लागण झालेल्या त्या रुग्णावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यानंतर एक दिवस त्यांच्या मुलाला तुमच्या वडिलांचं निधन झालं असं कळविण्यात आलं. मुलगा जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हा त्याला कळलं की मृतदेह हा अंत्यसंस्कारासाठीही नेण्यात आला आहे. नातेवाईकांची वाट न पाहता असं का करण्यात आलं असं जेव्हा मुलाने विचारलं तेव्हा मृत्यू होऊन बराच वेळ झाला, मात्र तुमचा फोन नंबर मिळत नसल्याने कळविण्यास उशीर झाल्याचं थातूर मातूर कारण हॉस्पिटलने मुलाला सांगितलं. मात्र त्या मुलाचे हाल येवढ्यावरच थांबले नाहीत. तो जेव्हा स्मशानभूमीत गेला आणि वडिलांच शेवटचं दर्शन घेऊ द्या अशी विनवणी केली तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे 51 हजारांची मागणी केली. त्यानंतर ते 31 हजारापर्यंत खाली आलेत. शेवटी मुलांने पोलिसांकडे तक्रार केली. मोठी बातमी! बंड शमलं; सचिन पायलट यांच्या घरवापसीचा प्रस्ताव निश्चित त्या लोकांनी पोलिसांचं सुद्धा ऐकलं नाही. शेवटी तो मुलगा आणि नातेवाईक अंत्यदर्शन न घेतलाच घरी निघून आलेत. आता कुटुंबीय हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत. भारतात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं समोर येत आहे. सलग चौथ्या दिवशीही 60 हजारहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाख 15 हजार 075 वर पोहोचली आहे. Honda ची CT125 Hunter Cub भारतात कधी होणार लाँच? जाणून घ्या फिचर्स आतापर्यंत कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 1,007 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 6 लाख 15 हजार 945 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहे. तर 15 लाख 35 हजार 744 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 44, 386 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.जगभरातील कोरोना आकडेवारीचा विचार करता अमेरिका आणि ब्राझिलनंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.