मराठी बातम्या /बातम्या /देश /10 वीच्या प्रश्नपत्रिकेत शेतकऱ्यांचा 'उपद्रवी आणि दंगलखोर' उल्लेख; नवा राजकीय वाद उफाळला

10 वीच्या प्रश्नपत्रिकेत शेतकऱ्यांचा 'उपद्रवी आणि दंगलखोर' उल्लेख; नवा राजकीय वाद उफाळला

चेन्नईतील एका सीबीएसई शाळेने (CBSE School) प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीत (Republic day tractor rally) सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा उल्लेख 'दंगलखोर' आणि 'हिंसक उपद्रवी' (Miscreants and violent Maniacs) असा केला आहे.

चेन्नईतील एका सीबीएसई शाळेने (CBSE School) प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीत (Republic day tractor rally) सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा उल्लेख 'दंगलखोर' आणि 'हिंसक उपद्रवी' (Miscreants and violent Maniacs) असा केला आहे.

चेन्नईतील एका सीबीएसई शाळेने (CBSE School) प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीत (Republic day tractor rally) सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा उल्लेख 'दंगलखोर' आणि 'हिंसक उपद्रवी' (Miscreants and violent Maniacs) असा केला आहे.

चेन्नई, 20 फेब्रुवारी: शेतकरी आंदोलनावरुन (Farmer Protest) आता आणखी एका नव्या वादाला (New Controversy) तोंड फुटलं आहे. चेन्नईतील एका सीबीएसई शाळेने (CBSE School) प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीत (Republic day tractor rally) सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा उल्लेख 'दंगलखोर' आणि 'हिंसक उपद्रवी' (Miscreants and violent Maniacs) असा केला गेला आहे. त्यामुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे. प्रश्नपत्रिका (10th question paper) समोर आल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे. तीन कृषी कायद्यांच्या निषेर्धात शेतकऱ्यांनी 26 जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली होती. यावेळी हिंसाचार भडकला होता.

नेमकं प्रकरण काय आहे?

द न्यूज मिनिट वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नईतील एका सीबीएसई शाळेत 11 फेब्रुवारी रोजी दहावीची परीक्षा सुरू होती. त्यावेळी शेतकरी आंदोलन संबंधित एक प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आला होता. या प्रश्नात, आंदोलनात सामील झालेल्या शेतकर्‍यांचं वर्णन 'दंगलखोर' आणि 'हिंसक उपद्रवी' असं करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांना या प्रश्नाच्या अनुषंगाने संपादकाला पत्र (लेटर टू एडिटर) लिहिण्यास सांगितलं होतं. तसंच 'हिंसक कट्टरतावाद' थांबविण्यासाठी काय उपाय असू शकतात, याची माहितीही लिहायला सांगितली होती.

(हे वाचा - साताऱ्यातील पावसात झालेल्या 'त्या' सभेचं गुपित आलं समोर; सुप्रिया सुळेंचा खुलासा)

खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर शेतकरी नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलनं करत आहेत. संबंधित तीनही कायदे मागे घेण्याची मागणी शेतकरी करत आहेत. दरम्यान, 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी शेतकरी संघटनांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. त्यावेळी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये हिंसाचार झाला. ज्यात शेतकऱ्यांसोबतच अनेक पोलीसही जखमी झाले होते.

(हे वाचा -Toolkit Case: दिशा रवीच्या अडचणीत वाढ; न्यायालयीन कोठडीत रवानगी)

शहरात ट्रॅक्टर रॅली सुरू झाल्यानंतर दोन तासांनी काही शेतकऱ्यांनी शहरात प्रवेश करण्यासाठी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले होते. तसंच शहरातील अनेक भागात तोडफोड करण्यात आली होती. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. दर्शन पाल सिंह आणि योगेंद्र यादव यांच्यासह 37 शेतकरी नेत्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस सातत्याने संबंधित लोकांना अटक करताना दिसत आहे.

First published:
top videos

    Tags: CBSE, Chennai, Crime news, Farmer protest, India, Police, Red fort delhi