जाहिरात
मराठी बातम्या / देश / Meghdoot App : शेतकऱ्यांना पुढच्या तीन तासात हवामानाची माहिती देणारे अॅप आता नव्या रुपात

Meghdoot App : शेतकऱ्यांना पुढच्या तीन तासात हवामानाची माहिती देणारे अॅप आता नव्या रुपात

Meghdoot App : शेतकऱ्यांना पुढच्या तीन तासात हवामानाची माहिती देणारे अॅप आता नव्या रुपात

शेतकऱ्यांवर सगळ्यात जास्त अस्मानी संकटांचा सामना करावा लागतो यामुळे त्यांच्यासाठी मागच्या तीन वर्षांपूर्वी हवामान विभागाने मेघदूत नावाचे मोबाईल अॅप काढले आहे. (Meghdoot App)

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 ऑगस्ट : शेतकऱ्यांवर सगळ्यात जास्त अस्मानी संकटांचा सामना करावा लागतो यामुळे त्यांच्यासाठी मागच्या तीन वर्षांपूर्वी हवामान विभागाने मेघदूत नावाचे मोबाईल अॅप काढले आहे. (Meghdoot App) दरम्यान त्यामध्ये हवामान विभागाने काही बदल केले आहेत. सगळ्याच महत्वाचे म्हणजे याद्वारे आपल्याला आता दर तीन तासांनी हवामानाच्या गंभीर इशाऱ्यांची तातडीने माहिती मिळणार आहे. तसेच शेतीवरील आधारित अन्य गोष्टींचीही माहिती मिळणार आहे.

जाहिरात

दरम्यान या अॅपद्वारे मिळणारी माहिती आणि सल्ले देशातील 732 जिल्ह्यांतील 1हजार 19 स्थानकांवरून एकत्रित केली जाणार आहे. तसेच मेघदूत अॅपवर दर मंगळवार आणि शुक्रवारी द्वि-साप्ताहिक हवामान सूचना अपडेट केल्या जाणार आहेत. ते संबंधित भौगोलिक क्षेत्रावरील अल्प-मुदतीच्या आणि विस्तारित-श्रेणीच्या (एक पंधरवड्याच्या) हवामान अंदाजांवर आधारित असणार आहेत. IMD ग्रामीण कृषी मौसम सेवे अंतर्गत स्थापन केलेल्या एकूण 330 कृषी नेटवर्क चालवते, जे भारतातील सर्व प्रमुख भाग कव्हर करण्यासाठी माहिती संकलित करते असते.

हे ही वाचा :  Maharashtra Weather Update : ऐन पावसाळ्यात ‘या’ जिल्ह्यात उन्हाच्या झळा तर काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट

IMD कडून कृषी विभाग राष्ट्रीय, राज्य, जिल्ह्यासह तालुका स्तरावर इंग्रजी आणि 13 प्रादेशिक भाषांमध्ये दर मंगळवार आणि शुक्रवारी माहिती प्रदर्शीत करत असते. जिल्हा आणि तालुका स्तरावर आगामी पाच दिवसांसाठी संभाव्य तापमान, आर्द्रता, पाऊस, वाऱ्याचा वेग आणि त्याची दिशा याबद्दल शेतकऱ्यांना अपडेट मिळणार असल्याने त्यांना सजग राहता येणार आहे.

जाहिरात

हवामानातील बदलांसाठी आणि तालुका किंवा जिल्ह्यांवरील महत्त्वाच्या हवामान अंदाजा आदी कोणत्याही महत्वाच्या हवामान बदलाबाबत सल्ल्यासाठी या अॅपमध्ये बदल केले आहेत. तीन तासांतून एकदा हे अॅप अपडेट केले जाते.

हे ही वाचा :  पंजाबमध्ये PM मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीचं प्रकरण, SSP हरमनदीप सिंग हंस यांच्यावर ठपका

अॅपच्या अलर्टमध्ये तात्काळ हवामानाच्या घटनेचा तपशील समाविष्ट असेल जेणेकरून शेतकरी त्यांच्या शेतात व्यावहारिक कृती करू शकतील. यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे. मेघदूत हे अॅप शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात