जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Weather Update : ऐन पावसाळ्यात ‘या’ जिल्ह्यात उन्हाच्या झळा तर काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट

Maharashtra Weather Update : ऐन पावसाळ्यात ‘या’ जिल्ह्यात उन्हाच्या झळा तर काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट

Maharashtra Weather Update : ऐन पावसाळ्यात ‘या’ जिल्ह्यात उन्हाच्या झळा तर काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट

राज्यात काही जिल्ह्यात पाऊस थांबला असला तरी काही ठिकाणी पावसाची संततधार सुरूच आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरूच असल्याचे चित्र आहे. (Maharashtra Weather Update)

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 ऑगस्ट : राज्यात काही जिल्ह्यात पाऊस थांबला असला तरी काही ठिकाणी पावसाची संततधार सुरूच आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरूच असल्याचे चित्र आहे. (Maharashtra Weather Update) दरम्यान होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत किंचीत वाढ झाल्याचे दिसून आहे. याचबरोबर काही भागात पावसाने उघडीप दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. आज (ता. 25) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जाहिरात

दरम्यान देशातील राजस्थान आणि परिसरात कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे. अजमेर, शिवपुरी, सिधी ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे कमी दाबाच्या पट्टयाचा प्रभाव असल्याने जोरदार पावसाची शक्यता आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. दरम्यान कोकणातील घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस होत असल्याने भात पिकाला पोषक असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

 हे ही वाचा :  LIVE Updates : रत्नागिरीमध्ये दोन एसटी बसची समोरासमोर धडक, २५ प्रवासी जखमी

राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान होत असले तरी अनेक भागांत मुख्यतः पावसाची उघडीप असल्याचे चित्र आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याकडील भागात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. 25 विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीपीसह हलक्या सरींची शक्यता आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातही वाढ झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपासून काही जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी असे सांगण्यात आले आहे.

जाहिरात

राज्यातील विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे.

हे ही वाचा :  प्रवाशांच्या आंदोलनानंतर मध्य रेल्वे बॅकफूटवर! AC Local बद्दल घेतला महत्त्वाचा निर्णय

याचबरोबर मागच्या 24 तासांता राज्यातील माथेरान 70, पेण 60, वाकवली 50, खालापूर, कर्जत, जव्हार प्रत्येकी 40, सुधागड पाली, विक्रमगड, अलिबाग, पोलादपूर, वाडा, मंडणगड प्रत्येकी 30. तर  मध्य महाराष्ट्रातील लोणावळा 60, गगनबावडा 50, महाबळेश्वर, राधानगरी, त्र्यंबकेश्वर प्रत्येकी 30. घाटमाथा दावडी, ताम्हिणी 110, शिरगाव, डुंगरवाडी प्रत्येकी 90, कोयना नवजा, अंभोणे प्रत्येकी 80, वळवण 70, खोपोली, भिरा प्रत्येकी 60 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात