मराठी बातम्या /बातम्या /देश /

Nitin Gadkari : चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या कारचा फोटो पाठवल्यास मिळणार 500 रुपये, काय आहे गडकरींचा प्लॅन

Nitin Gadkari : चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या कारचा फोटो पाठवल्यास मिळणार 500 रुपये, काय आहे गडकरींचा प्लॅन

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) आपल्या कामाच्या शैलीमुळे ते नेहमी चर्चेत असतात. ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) आपल्या कामाच्या शैलीमुळे ते नेहमी चर्चेत असतात. ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) आपल्या कामाच्या शैलीमुळे ते नेहमी चर्चेत असतात. ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

  • Published by:  Sandeep Shirguppe

नवी दिल्ली, 17 जून : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) आपल्या कामाच्या शैलीमुळे ते नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या डोक्यातून येणाऱ्या भन्नाट योजना सरकार (government) आणि जनतेला अशा लागू होतात की त्या मान्यच कराव्या लागतात दरम्यान केंद्रीय मंत्री गडकरी यांनी वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत नवीन कल्पना मांडली आहे. चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क (traffic issue) असेल आणि तुम्ही तो फोटो पाठवला तर तुम्हाला सरकारकडून 500 रुपये मिळणार आहेत. (If the car is parked in the wrong place and you send that photo, you will get Rs.500 from the government)

चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या गाडीचा फोटो पाठवणाऱ्याला 500 रुपये देणार असा कायदा केंद्र सरकार (central government new law) आणणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल (दि.16) गुरुवारी दिली. गडकरी म्हणाले की, रस्त्यावर ठिकठिकाणी वाहने उभी असतात, त्यामुळे चालणे कठीण होते. विशेषतः दिल्लीत ही समस्या अधिक आहे.

हे ही वाचा : नॅशनल हेरॉल्ड केस : ईडीचा राहुल गांधींना मोठा दिलासा, आजची सुनावणी स्थगित

काय म्हणाले गडकरी?

गडकरी म्हणाले की, केंद्र सरकार लवकरच एक कायदा आणणार आहे, जो आपली गाडी रस्त्यावर पार्क करेल आणि त्यावर क्लिक करून कोणताही फोटो पाठवेल. जर समजा वाहन मालकाला 1000 रुपये दंड ठोठावला असेल, तर पाठवणाऱ्याला 500 रुपये दिले जातील. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न सुटणार आहे. ते पुढे म्हणाले कि,  लोक आपली घरे मोठी बांधतात पण पार्किंगसाठी घरासमोर जागा सोडत नाहीत. ही दुर्देवी बाबत असल्याचे ते म्हणाले.

गडकरींनी त्यांच्या घराचे उदाहरण देताना सांगितले की, त्यांच्या नागपुरातील घरातील जेवण करायला येणाऱ्याकडे दोन सेकंड हँड गाड्या आहेत. पूर्वी अमेरिकेत असे व्हायचे, जेव्हा एखादी महिला साफसफाई करायला यायची, तेव्हा तिच्याकडे गाडी असायची, म्हणून आम्ही ते आश्चर्यचकितपणे पाहायचो, आता इथेही तेच होत आहे. आपल्या घराचा संदर्भ देत गडकरी म्हणाले की, त्यांनी नागपुरातील त्यांच्या घरात 12 वाहनांसाठी पार्किंग केली आहे. पण मी एकही गाडी रस्त्यावर पार्क करत नाही. भारतात एका कुटुंबात चार लोक आणि सहा वाहने अशी  स्थिती आहेत.

हे ही वाचा : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी होणार कृषीमंत्र्यांच्या थेट इशारा

दिल्लीचे उदाहरण देताना ते म्हणाले की, दिल्लीचे लोक नशीबवान आहेत कारण त्यांच्या गाडीच्या पार्किंगसाठी आम्ही रस्ते मोठे बनवले आहेत. यामुळे लोकांना रस्त्यावर गाडी पार्क करून जाण्याची सवय लागली आहे. यामुळे तेथील लोक आपल्या जागेत आपली वाहने पार्किंग करत नाही, प्रत्येकजण आपली गाडी रस्त्यावर पार्क करतो यामुळे वाहतुकीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे यासाठी सरकार नवीन कायदा करण्याच्या तयारीत आहे.

First published:

Tags: Central government, Daily news, Nitin gadkari, Traffic, Traffic department, Traffic Rules, Traffic signal