जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कृषी / agriculture minister dada bhuse : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी होणार कृषीमंत्र्यांच्या थेट इशारा

agriculture minister dada bhuse : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी होणार कृषीमंत्र्यांच्या थेट इशारा

agriculture minister dada bhuse : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी होणार कृषीमंत्र्यांच्या थेट इशारा

कृषी मंत्री दादा भुसे (agriculture minister dada bhuse) हे रात्री उशिरा सातारा जिल्हा (satara district) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला

  • -MIN READ
  • Last Updated :

सातारा, 17 जून : कृषी मंत्री दादा भुसे (agriculture minister dada bhuse) हे रात्री उशिरा सातारा जिल्हा (satara district) दौऱ्यावर आले असून त्यांनी सातारा शहरालगत असणाऱ्या वाढे गावात कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. (Department of Agriculture Review Meeting) यावेळी खरीप हंगामाबाबत (kharip season)माहिती घेऊन  शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. मान्सूनचे (monsoon update) आगमन उशिरा होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी बाबत घाई न करता पावसाचा अंदाज घेऊन 70 ते 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी असे आवाहन या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी केले आहे.

जाहिरात

कृषी मंत्री दादा भुसे यांनी घेतलेल्या कृषी आढावा बैठकीत सातारा कृषी विभागाने बनावट बियाने (bogus seeds) बाबत केलेल्या कारवाईचे कौतुक करत. ते म्हणाले महाराष्ट्रातील बनावट बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यांना इशारा दिला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात बनावट बियाण्यांचा प्रकार निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून कठोरातील कठोर कारवाई करणार असल्याचे बैठकीत त्यांनी सांगितले आहे.  

हे ही वाचा :  Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरात घसरण, पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?

कृषी आढावा बैठकीनंतर शेतकरी संवाद बैठक पार पडली यावेळी शेतकऱ्यांना उद्भवत असलेल्या प्रश्नांबाबत त्यांनी उत्तरे दिली या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सातारा तालुक्यातून शेतकरी वर्ग उपस्थित होता.

कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडून ही सूचना

राज्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम-2022 मध्ये दर्जेदार, प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करावा, बियाण्यांची उपलब्धता, पुरवठा सुरळीत व्हावा, सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता गृहीत धरून सोयाबीनच्या बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करावे, तेलबियांच्या बियाणांची उपलब्धता वाढवावी, योजनांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या बीज प्रकल्पांना गती द्यावी, कोणत्याही शेतकरी बांधवांची तक्रार येऊ नये यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले.  

जाहिरात

हे ही वाचा :  जेवणाच्या उधारीसाठी हॉटेलमालकाने का अडवलं? सदाभाऊ खोतांचा राष्ट्रवादीवरच आरोप, म्हणाले…

यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. याचबरोबर सोयाबीनला चांगला भावही मिळत असल्याने राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी यंदा सोयाबीन पेरणीची गडबड करण्याची शक्यता आहे. यावर्षी मान्सून पूर्व पाऊस चांगला होत असल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी पोषक वातावरण असले तरी अचानक पाऊस थांबण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते याही सूचना दादा भुसे यांनी केल्या.

जाहिरात

सोयाबीन बियाणांची पेरणी करतांना शेतकऱ्यांनी स्वत:कडे असलेले चांगले बियाणे वापरावे. प्रति हेक्टरी बियाणांचा दर 75 किलोवरून 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकन पदध्तीने किंवा प्लँटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्क्यापेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात