नवी दिल्ली 25 मार्च : कोरोना विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पुन्हा एकदा सावध केलंय. सर्व देश कोरोनाविरुद्ध युद्ध लढत असून देशावासियांनी त्यात सहभाग घेतला आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. मंगळवारी बोलताना त्यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. पंतप्रधानांनी आज पुन्हा एकदा लोकांना त्या 21 दिवसांची आठवण करून दिली आहे. आपण 21 दिवस जर घराबाहेर प़डलो नाही तरच आपण हे युद्ध जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाविरुद्ध लढण्याचा हाच एकमेव मंत्र असल्याचंही त्यांनी सांगितलं. घराच्या बाहेर पडलं तर जी परिस्थिती ओढवेल त्याचा विचारही आपल्याला करता येणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता. आज सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी लोकांना त्या 21 दिवसांची आठवण करून देत घरीच थांबण्याची विनंती केली. देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. देशातल्या सरकारी हॉस्पिटल्समधले सर्व डॉक्टर्स आणि नर्सेस सध्या या व्हायरसविरुद्ध लढत आहेत. कोरोना पेशंट्सवर उपचार करताना या डॉक्टर्स आणिन नर्सेसना आपला जीव धोक्यात घालावा लागतो. मात्र कर्तव्य असल्याने सर्व डॉक्टर्स प्रयत्नांची शर्थ करत आहेत. या पार्श्वभूमीवर ओरिसा सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. अशा सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांचं वेतन Advance म्हणून देण्यात येणार आहे. असा निर्णय घेणारं ओरिसा हे पहिलच राज्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ही घोषणा केली. वाचा - कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेसना मिळणार 4 महिन्यांचा Advance पगार देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवणं आणि घरातून बाहेर न पडण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत. या आदेशाचं पालन राज्य सरकारनं आपल्या राज्यात योग्य पद्घतीनं अंमलात आणण्याचे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. वाचा - #21दिवस : शहरं लॉकडाउन; गावांचं काय? ‘इथे परिस्थिती गंभीर आहे, प्लीज काहीतरी करा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 21 दिवसांच्या लॉकडाऊन घोषणेनंतर तेलंगणा सरकारनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता तेलंगणातील नागरिकांनी घराबाहेर पडल्यास दिसताच क्षणी गोळी घालण्याचे आदेश देऊ असा इशारा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नागरिकांना इशारा दिला आहे.
आज कोरोनी के खिलाफ जो युद्ध पूरा देश लड़ रहा है, उसमें 21 दिन लगने वाले हैं। हमारा प्रयास है इसे 21 दिन में जीत लिया जाए: PM @narendramodi #IndiaFightsCorona
— PMO India (@PMOIndia) March 25, 2020

)







