भुवनेश्वर 25 मार्च : देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. देशातल्या सरकारी हॉस्पिटल्समधले सर्व डॉक्टर्स आणि नर्सेस सध्या या व्हायरसविरुद्ध लढत आहेत. कोरोना पेशंट्सवर उपचार करताना या डॉक्टर्स आणिन नर्सेसना आपला जीव धोक्यात घालावा लागतो. मात्र कर्तव्य असल्याने सर्व डॉक्टर्स प्रयत्नांची शर्थ करत आहेत. या पार्श्वभूमीवर ओरिसा सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. अशा सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांचं वेतन Advance म्हणून देण्यात येणार आहे. असा निर्णय घेणारं ओरिसा हे पहिलच राज्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ही घोषणा केली. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवणं आणि घरातून बाहेर न पडण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत. या आदेशाचं पालन राज्य सरकारनं आपल्या राज्यात योग्य पद्घतीनं अंमलात आणण्याचे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 21 दिवसांच्या लॉकडाऊन घोषणेनंतर तेलंगणा सरकारनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता तेलंगणातील नागरिकांनी घराबाहेर पडल्यास दिसताच क्षणी गोळी घालण्याचे आदेश देऊ असा इशारा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नागरिकांना इशारा दिला आहे.
आयसोलेशन वॉर्डमधील भीतीदायक 12 दिवस, कोरोनाची लढाई जिंकलेला रुग्ण म्हणाला…
लॉकडाऊन दरम्यान कुणी घराच्या बाहेर पडल्यास गोळ्या घालण्याचे आदेश देऊ, असा कठोर इशारा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे.
सावधान! तुमच्या आजूबाजूला असू शकतो कोरोना रुग्ण, लक्षणं न दिसताच पसरवतोय व्हायरस
तेलंगणामध्ये 36 जण कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. तर राज्यातील 19 हजारहून अधिक लोकांवर प्रशासनाची नजर आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव टाळण्यासाठी तेलंगणा सरकारनं केंद्राच्या निर्देशाची अंमलबजावणी केली आहे.
Odisha CM Naveen Patnaik sanctions 4 month advance salary payment to health care personnel. #COVID19 pic.twitter.com/yGOYsVUFDS
— ANI (@ANI) March 25, 2020
देशभरात सर्व ठिकाणी लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. मात्र तरीही नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा इशारा तेलंगणा सरकारनं दिला आहे.

)







