कोरोनाविरोधात एकमेव आशेचा किरण असलेल्या Plasma therapy बाबत ICMR चं मोठं स्पष्टीकरण

कोरोनाविरोधात एकमेव आशेचा किरण असलेल्या Plasma therapy बाबत ICMR चं मोठं स्पष्टीकरण

प्लाझ्मा थेरेपी (plasma therapy) सध्या प्रायोगिक अवस्थेत आहे, असं ICMR ने सांगितलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 एप्रिल : जीवघेण्या अशा कोरोनाव्हायरसवर (Coronavirus) सध्या कोणतेच प्रभावी उपचार उपलब्ध नाहीत. अशात आशेचा किरण आहे ती प्लाझ्मा थेरेपी (plasma therapy). मोदी सरकारने गंभीर कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपी वापरण्यास परवानगी दिली होती. मात्र आता या प्लाझ्मा थेरेपीबाबत इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.

कोरोनाव्हायरसविरोधात प्लाझ्मा थेरेपी सध्या प्रायोगिक अवस्थेत आहे, उपचार म्हणून त्याला मान्यता मिळालेली नाही, असं ICMR ने सांगितलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं, "प्लाझ्मा थेरेपी सध्या प्रायोगिक अवस्थेत आहे. प्लाझ्मा थेरेपी ही कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी म्हणून वापरता येईल, याचे कोणतेही पुरावे नाही. त्यामुळे कोरोनाव्हायरसवर उपचार म्हणून प्लाझ्मा थेरेपी किती प्रभावी ठरू शकते, याचा अभ्यास करण्यासाठी ICMR मार्फत राष्ट्रीय पातळीवर प्रयोग सुरू करण्यात आलेत"

"कोरोनाव्हायरवर उपचारासाठी म्हणून प्लाझ्मा थेरेपीला मान्यता देण्यात आलेली नाही, तसेच ही थेरेपी प्रभावी आहे, असे ठोस पुरावे अद्याप नाहीत. अमेरिकेतही या थेरेपीला प्रायोगिक तत्वावर मंजुरी देण्यात आली आहे", असं ICMR ने म्हटलं आहे.

"प्लाझ्मा थेरेपीमध्ये अनेक धोकेही आहेत. अॅलर्जिक रिअॅक्शन आणि फुफ्फुसाला हानी पोहोचून ही थेरेपी जीवघेणीही ठरू शकते", असंही ICMR ने सांगितलं आहे.

काय आहे प्लाझ्मा थेरेपी?

डॉक्टरांनी सांगितलं की, जो रुग्ण 3 आठवड्यांपूर्वी बरा झाला आहे, त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा घेतले जातात. एका व्यक्तीच्या रक्तातून जास्तीत जास्त 800 मिलीलीटर प्लाझ्मा घेतलं जाऊ शकतो, तर कोरोना रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज टाकण्यासाठी 200 मिलीमीटर प्लाझ्मा चढवलं जातं.

हे वाचा - कोरोनाच्या धोक्यामुळे मंत्रालय होणार सॅनिटाईज, 2 दिवस सर्व कामकाज राहणार बंद

दिल्लीतील AIIMS चे रणदीप गुलेरिया म्हणाले, "व्हायरसशी लढण्यासाठी रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याच्या रक्तात या अँटिबॉडीज कायम असतात. अशा व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा कोरोना रुग्णाच्या शरीरात सोडले जातात. जेणेकरून त्या प्लाझ्मातील अँटिबॉडीज रुग्णाच्या शरीरातील व्हायरसशी लढतील."

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - देशात कम्युनिटी लागण झाली का? आरोग्य मंत्रालयाने केला मोठा खुलासा

First published: April 28, 2020, 6:37 PM IST

ताज्या बातम्या