Home /News /mumbai /

कोरोनाच्या धोक्यामुळे मंत्रालय होणार सॅनिटाईज, 2 दिवस सर्व कामकाज राहणार बंद

कोरोनाच्या धोक्यामुळे मंत्रालय होणार सॅनिटाईज, 2 दिवस सर्व कामकाज राहणार बंद

मुख्यंमत्री उद्धव ठाकरे हेही मातोश्रीवरूनच कारभार बघत आहेत. तर ज्येष्ठ मंत्री क्वचितच मंत्रालयात येत असतात. सगळे मंत्री आपल्या घरूनच कामकाज करत आहेत.

    मुंबई 28 एप्रिल: महाराष्ट्राचं सर्व कामकाज ज्या इमारतींमधून चालतं त्या मंत्रालयाच्या दोनही इमारती दोन दिवस पूर्ण बंद राहणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या जुन्या आणि नव्या इमारती पूर्णपणे सॅनिटाईज होणार आहेत. केंद्र सरकारने जे मार्गदर्शक तत्व आखून दिले आहेत त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 29 आणि 30 एप्रिलला मंत्रालय पूर्णपणे बंद राहणार आहे अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली. दोनही इमारतीच्या खोल्या आणि भाग सॅनिटाईज करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या लॉकडाऊमुळे मंत्रालयात अतिशय कमी कर्मचारी कामावर आहेत. तर बहुतांश मंत्री आपल्या घरूनच कामकाज करत आहेत. मुख्यंमत्री उद्धव ठाकरे हेही मातोश्रीवरूनच कारभार बघत आहेत. तर ज्येष्ठ मंत्री क्वचितच मंत्रालयात येत असतात. सगळे मंत्री आपल्या घरूनच कामकाज करत आहेत. दरम्यान, देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. आता देशभर लॉकडाऊन आहे आणि विदेशातून होणारी हवाई वाहतूकही बंद आहे. पण देशांतर्गत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे संक्रमण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सगळ्यांना भीती आहे ती कम्युनिटी लागण झाली का याची? मात्र आरोग्य मंत्रालयाने यावर मोठा खुलासा केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल एकाच कार्यक्रमात, पण... आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना याबाबतचा खुलासा केला. देशात अजुनही कम्युनिटी लागण झाल्याचे ठोस पुरावे नाहीत असं त्यांनी सांगितलं. कम्युनिटी लागण म्हणजे बाहेरून संक्रमण घेऊन आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात न येताही झालेलं संक्रमण असं म्हणता येईल. यात समाजातल्या विविध घटकांना त्यांची लागण होत असते आणि त्याचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढतो. लॉकडाऊनमुळे देशात मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळविल्याची माहितीही त्यांनी दिली. बापरे! सलाईनच्या बॉक्समध्ये ठेवल्या दारूच्या बाटल्या, पोलिसांनी केला पर्दाफाश देशात गेल्या 24 तासांमध्ये 1543 एवढे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 29,435 एवढी झालीय. तर रुग्ण बरे होण्याची प्रमाण वाढलं असून ते 23.3 टक्क्यांवर गेल्याची माहिती त्यांनी दिली. ही अत्यंत चांगली गोष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या