Home /News /mumbai /

मुंबई महापालिकेचा आता कोर्टात दावा - मृतदेहापासून कोरोना संसर्गाचा धोका नाहीच

मुंबई महापालिकेचा आता कोर्टात दावा - मृतदेहापासून कोरोना संसर्गाचा धोका नाहीच

भारतातला मृत्यू दर हा कमी असून तो सध्या 2.18 टक्के एवढा आहे. जगात हा दर सर्वात कमी असल्याचं डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं.

भारतातला मृत्यू दर हा कमी असून तो सध्या 2.18 टक्के एवढा आहे. जगात हा दर सर्वात कमी असल्याचं डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं.

संक्रमित मृतदेहापासून इतरांना Covid0-19 चा संसर्ग होत नाही, असा दावा एका याचिकेसंदर्भात उत्तर देताना मुंबई महापालिकेनं केला आहे. आधीच्या नियमावली आणि शंकांना छेद देणारा हा दावा असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

    मुंबई, 19 मे : बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने Coronavirus संदर्भात आज एक अजब दावा कोर्टात करण्यात आलं. संक्रमित मृतदेहापासून इतरांना Covid0-19 चा संसर्ग होत नाही, असा दावा एका याचिकेसंदर्भात उत्तर देताना मुंबई महापालिकेनं केला आहे. मृतदेहापासून कोरोनाचा प्रसार होत असल्याची शंका असल्याने सर्व जगभरात कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत नियमावली पाळली जात आहे. भारतात आणि मुंबईतही तसे नियम आहे. कोरोनाबळींच्या मृतदेहाचे अंत्यविधी करताना आम्ही पुरेशी काळजी घेतो आणि नियमांचं पालन करतो, असं सांगत असतानाच मुंबई महापालिकेनं मृतदेहापासून संसर्ग होत असल्याचा कुठलाही पुरावा नाही, असाही दावा केला आहे. बांद्रा परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांनी बांद्र्याच्या कब्रस्तानात Covid-19 मुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह दफन करण्याला आक्षेप घेतला होता. त्यांनी कोरोनाग्रस्तांच्या दफनाला इथे बंदी करावी, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल केली. या याचिकेवर उत्तर देताना सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंबई महापालिकेने हा दावा केला आहे. कोरोनाव्हायरमुळे बळी गेलेल्यांचे मृतदेह पुरेशी काळजी न घेता पुरले गेले, तर बाजूच्या लोकवस्तीत कोरोनाचा फैलाव होण्याचा दावा आहे. बांद्रा कब्रस्तानच्या अगदी जवळ रहिवासी क्षेत्र असल्याने चिंता व्यक्त करत ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. "शवातून Covid-19 आजाराचा संसर्ग होत नाही", असं पालिकेचे सहायक वैद्यकीय अधिकारी दीपक चव्हाण यांनी पालिकेच्या वतीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. एका बाजून काही दिवसांपूर्वी मुंबईच्या आयुक्तांनीच कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी काय सोपस्कार करावे लागतील याची नियमावली जारी केली होती. आता मात्र पालिकेच्या मते, मृतदेहापासून धोका नाही, असं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहापासून संसर्ग झाल्याची एकही घटना नोंदली गेली नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या