Home /News /national /

भारतात कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात, ICMRने दिला इशारा

भारतात कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात, ICMRने दिला इशारा

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) काही आठवड्यांपूर्वी रॅंडम सॅम्पलिंगद्वारे कोरोना विषाणूची तपासणी सुरू केली होती.

    नवी दिल्ली, 10 एप्रिल : इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) काही आठवड्यांपूर्वी रॅंडम सॅम्पलिंगद्वारे कोरोना विषाणूची तपासणी सुरू केली होती. कोरोनाचे संक्रमण कम्युनिटी ट्रान्समिशनने तर होत नाही आहे ना, यासाठी ICMRने या तपासणीस सुरुवात केली होती. म्हणजेच भारतात कोरोना तिसऱ्या टप्प्यात आहे की नाही, यासाठी ICMRने हे पाऊल उचलले होते. याबाबत ICMRने दिलेल्या अहवालात आता असे सूचित केले गेले आहे की देशातील काही भागांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशन (सामुदायिक प्रसारण) होण्यास सुरूवात झाली आहे. याचा अर्थ भारतात तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी ते 2 एप्रिल या काळात ICMRने कोरोना विषाणूच्या 5911 संशयित रुग्णांची गंभीर तीव्र श्वसन आजार (SARI) चाचणी केली. यांपैकी 104 म्हणजे 1.8 टक्के रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होते. देशातील 15 राज्यांमधील 36 शहरांमध्ये या चाचण्या घेण्यात आल्या. वाचा-लॉकडाऊनसंदर्भात रविवारी घेणार मोठा निर्णय, महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता या राज्यांमध्ये 1 टक्क्यापेक्षा जास्त SARI प्रकरणे ज्या राज्यांमध्ये SARIचे एक टक्क्यांहून अधिक प्रकरणे आहेत त्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात 553 पैकी 21 प्रकरणे म्हणजे 3.8% , गुजरातमध्ये 792 पैकी 12 केस म्हणजे 1.6%, तामिळनाडू 577 पैकी 5 म्हणजेच 0.9%, आणि केरळमध्ये 502 प्रकरणातून 1 केस म्हणजेच 0.2 टक्के कम्युनिटी ट्रान्समिशनची शक्यता आहे. ICMRच्या अहवालात असे सूचित केले गेले आहे की सरकारने या राज्ये आणि जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोरोना विषाणूची वाढती घटना लक्षात घेऊन या जिल्ह्यांना प्राधान्य दिले पाहिजे. वाचा-धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट, पोलिसांसाठी उभारला पहिला 'सॅनिटायझेशन टेंट' असा आहे ICMR रिपोर्ट ICMR रिपोर्टनुसार 5911प्रकरणांपैकी केवळ २ पॉझिटिव्ह प्रकरणे अशी आहेत, ज्यातील एक रुग्ण कोरोना रूग्णाच्या थेट संपर्कात होता. दुसरे प्रकरण आंतरराष्ट्रीय प्रवासाशी संबंधित आहे. तर, 59 प्रकरणे अशी आहेत ज्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवास इतिहास नाही. म्हणजेच त्यांना देशभरात संसर्ग झाला आहे. ICMRचा पहिल्या अहवाल 14 मार्च रोजी आला होते. त्यावेळी कोरोना तपासणी केलेल्या लोकांची कोणतीही चाचणी पॉझिटिव्ह नव्हती. त्यानंतर, 15 ते 21 मार्च दरम्यान तपासणी केलेल्या 106 पैकी केवळ 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 22 मार्च ते 28 मार्च दरम्यान झालेल्या 2877 रूग्णांपैकी 48 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्याचप्रमाणे दुसर्‍या चाचणीत असेही म्हटले आहे की कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 83.3 % रुग्ण 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. तर, 81.4% रुग्ण 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. ICMRच्या दुसऱ्या रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झाले आहे की मार्च 14च्या आधी केलेल्या SARI टेस्ट केलेल्या रुग्णांची संख्या 0 होती, आता हीच संख्या 2.6% वाढली आहे. वाचा-कोरोनाच्या लढाईसाठी भारताला 16,500 कोटी देण्याचे या बँकेचे आश्वासन संकलन, संपादन-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या