गंगाजल वापरून कोरोनावर उपचाराचा प्रस्ताव, ICMR ने दिलं हे उत्तर

कोरोनावर उपचारासाठी गंगाजलाच्या वापराबाबत संशोधन व्हावं यासाठीचा प्रस्ताव आयसीएमआरकडे पाठवण्यात आला होता.

कोरोनावर उपचारासाठी गंगाजलाच्या वापराबाबत संशोधन व्हावं यासाठीचा प्रस्ताव आयसीएमआरकडे पाठवण्यात आला होता.

  • Share this:
    नवी दिल्ली, 07 मे : इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने गंगाजल कोरोनावर उपचारासाठी वापरण्याबाबत संशोधन कऱण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. जल संसाधन मंत्रालयाने हा प्रस्ताव पाठवला होता की, कोरोना व्हायरसवर उपचारासाठी गंगाजल वर संशोधन करायला हवं. आयसीएमआरने हा प्रस्ताव फेटाळून लावत म्हटलं की यासाठी वैज्ञानिक माहितीची गरज आहे.  आयसीएमआरमध्ये संशोधन प्रस्तावांचे मूल्यांकन करणाऱ्या समितीचे प्रमुख डॉक्टर गुप्ता यांनी सांगितलं की, सध्याची माहिती पुरेशी नाही आणि त्यातून कोरोनाच्या उपचारासाठी वेगवेगळ्या स्रोतांमधून गंगाजल वर क्लिनिकल रिसर्च करता येणार नाही. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जल संसाधन मंत्रालयांतर्गत असलेल्या राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशनला गंगा नदीवर काम करणाऱ्या लोकांकडून आणि एनजीओकडून अनेक प्रस्ताव आले आहेत. त्यामध्ये कोरोनावर उपचारासाठी क्लिनिकल रिसर्च करण्याची विनंती करण्यात आली आहे. या प्रस्तावांना आय़सीएमआरकडे पाठवण्यात आलं. गंगा मिशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या प्रस्तावावर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकांशी चर्चा करण्यात आली होती. त्यांनी गंगा नदीचे गुण समजण्यासाठी त्याच्या पाण्याची गुणवत्तेचा अभ्यास केला होता. त्यानुसार गंगेच्या पाण्यात रोग तयार कऱणाऱ्या बॅक्टेरियांच्या तुलनेत व्हायरसची संख्या जास्त आहे. गंगा मिशन आणि संस्थेच्या चर्चेवेळी वैज्ञानिकांनी हेसुद्धा सांगितलं की, गंगेच्या पाण्यात व्हायरस रोखणारे गुण असल्याचा कोणताच पुरावा नाही. हे वाचा : IMD आता बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादसाठीही वर्तवतंय हवामान अंदाज; हे आहे कारण प्रस्तावाबाबत एका अधिकाऱ्याने सांगितलं की, आम्हाला जे प्रस्ताव मिळाले होते ते तसेच आयसीएमआरला पाठवले. यातील एका प्रस्तावात असाही दावा करण्यात आला आहे की गंगेच्या पाण्यात निंजा व्हायरस आहे. तसंच गंगेचं शुद्ध पाणी शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढवते यामुळे व्हायरसशी लढण्यास मदत मिळेल असाही दावा केला आहे. हे वाचा : देशात मीठाचा पुरवठा कमी होणार? लॉकडाऊनमुळे उत्पादन घटलं एका प्रस्तावात अशी विनंती केली आहे की, गंगेचं पाणी व्हायरस रोखणारं आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याची क्षमता असल्याबाबतच्या मुद्यावर संशोधन व्हावं. या प्रश्नांवर आयसीएमआर कडून अधिकृत उत्तर मिळालेलं नाही असंही गंगा मिशनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे वाचा : 8 चाचण्या अन् 1 महिन्याची झुंज,3 वर्षांच्या मुलाचा संघर्ष पाहून डॉक्टरही गहिवरले
    First published: