Home /News /national /

IMD आता बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादसाठीही वर्तवतंय हवामान अंदाज; हे आहे छोट्या बदलामागचं मोठं रहस्य

IMD आता बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादसाठीही वर्तवतंय हवामान अंदाज; हे आहे छोट्या बदलामागचं मोठं रहस्य

भारतीय हवामान खात्याने सध्या त्यांच्या जम्मू काश्मीरच्या हवामान अंदाज सांगण्याच्या पद्धतीत थोडा बदल केला आहे. पाकव्याप्त काश्मीरचाही अंदाज ते वर्तवत आहेत. काय आहे त्यामागची बातमी?

    नवी दिल्ली, 7 मे : भारतीय हवामान खात्याने सध्या त्यांच्या जम्मू काश्मीरच्या हवामान अंदाज सांगण्याच्या पद्धतीत थोडा बदल केला आहे.  त्यांनी जम्मू काश्मीरचा विभागीय अंदाज सांगताना जम्मू काश्मीर, लडाख आणि गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद असे विभाग जाहीर करून त्यानुसार अंदाज द्यायला सुरुवात केली आहे. गिलगिट बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद हे पाकव्याप्त काश्मीरमधले प्रांत आहेत. एवढे दिवस भारतीय हवामान विभाग या प्रांतांसाठी हवामान अंदाज देत नव्हता. आत्ता अचानक हे विभाग करण्याचं कारण काय? मंगळवारपासून IMD ने हा छोटा बदल केला आहे. पण हे पाकिस्तानातल्या राजकीय घडामोडींना दिलेलं चोख उत्तर आहे. 30 एप्रिलला पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गिलगिट- बाल्टिस्तानमध्ये निवडणुका घ्यायची परवानगी दिली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने लगेचच त्यांची यावर तीव्र नाराजी पाकिस्तानकडे व्यक्त केली. भारताचा अविभाज्य भाग असणाऱ्या जम्मू काश्मीर राज्याच्या अनैतिक आणि बेरायदेशीरपणे कब्जा केलेल्या प्रांतात परस्पर निवडणुका घेऊन सरकार स्थापनेचा प्रयत्न करण्याचा पाकिस्तानी न्यायसंस्थेला कोणताही अधिकार नाही, अशा स्पष्ट शब्दांत भारताने आपला आक्षेप नोंदवला. पाकिस्तानी मंत्रालयाने लगेचच हा आक्षेप फेटाळला. जगासाठी हा भाग वादग्रस्त काश्मीर खोऱ्याचा प्रदेश आहे आणि यावर दोन्ही देशांचा दावा आहे. पण पाकिस्तानने यापूर्वी तिथे सरकार स्थापन करण्याची आगळिक केलेली नव्हती. आता हा प्रदेश भारताचं अविभाज्य अंग आहे, हे जगाच्या दृष्टीने अधोरेखित व्हावं यासाठी जम्मू काश्मीर राज्याचे चार प्रभाग भारताकडून दाखवले जात आहेत. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद मिळून अखंड काश्मीर प्रांत भारताचा आहे, हे स्पष्टपणे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. भारताच्या या धोरणात्मक निर्णयाचा भाग म्हणून IMD नेही त्यानुसार त्यांच्या विभागवार हवामान अंदाजात बदल केले आहेत.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Pakistan, Pok

    पुढील बातम्या