मराठी बातम्या /बातम्या /देश /

आता चीनची गरज नाही, कोरोना टेस्टसाठी  या 4 दिग्गज कंपन्या भारताला बनवणार आत्मनिर्भर!

आता चीनची गरज नाही, कोरोना टेस्टसाठी  या 4 दिग्गज कंपन्या भारताला बनवणार आत्मनिर्भर!

जगभरातून शंका घेतल्या गेल्यानंतर आता 45 केंद्रांवर 40 हजार लोकांना ही लस देण्यात येणार असल्याचं रशियाने म्हटलं आहे.

जगभरातून शंका घेतल्या गेल्यानंतर आता 45 केंद्रांवर 40 हजार लोकांना ही लस देण्यात येणार असल्याचं रशियाने म्हटलं आहे.

हे उत्पादन पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यास भारत स्वयंपूर्ण तर बनेलच पण इतर देशांनाही या किट्स निर्यात करण्याची क्षमता भारताला प्राप्त होणार आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
पुणे 14 मे: कोरोनाविरुद्धच्या लढाईत संशोधनात भारताने आणखी एक टप्पा गाठला आहे. ICMR-NIV यांनी Antibody शरीरात शोधण्यासाठी पूर्णपणे स्वदेशी अशी IgG ELISA टेस्ट किट शोधून काढली आहे. या किटच्या उत्पादनासाठी आता  4 कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. SPAN, J MITRA, Cipla आणि Zydus-Cadila 4 दिग्गज औषध निर्मार्त्या कंपन्या पुढाकार घेणार आहेत. त्यामुळे अशा किट्ससाठी चीन किंवा इतर देशांवर असलेलं भारताचं अवलंबित्व बंद होणार असून भारत आत्मनिर्भर होणार आहे. शरीरात अँटिबॉडिज निर्माण झाल्या आहेत किंवा नाही हे शोधण्यासाठी अशा किट्सची गरज असते.  आत्तापर्यंत भारताला इतर देशांवर अवंलबून राहावं लागत होतं. मात्र आता हे उत्पादन पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यास भारत स्वयंपूर्ण तर बनेलच पण इतर देशांनाही या किट्स निर्यात करण्याची क्षमता भारताला प्राप्त होणार आहे. BREAKING : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून आज विक्रमी रुग्णांची नोंद झाली. संख्या वाढत असल्याने सरकार आणि राज्य हादरून गेलं आहे. आज राज्यात १६०२ नवे रुग्ण सापडले. तर राज्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या आकड्यानं हजाराचा टप्पा ओलांडला आहे. रुग्णाची एकूण संख्या ही २७५२४ वर गेली आहे. आज राज्यात ४४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या १०१९ वर गेली आहे. काळा पैसा आणण्याची मोदींना कोरोना संकटात संधी, शिवसेनेचा 'आत्मनिर्भर' टोला
 मुंबईत आज तब्बल ९९१ रुग्णांनी वाढ झाली. तर आज ५१२ जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. मुंबईत आज 998 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनाच्या एकूण रुग्णाची संख्या 16579वर पोहचली आहे.
आज कोरोणामुळे 25लोकांचा मृत्यू झाला असून आजवर मुंबईत एकूण 621 जणाचा मृत्यू झाला आहे. आज 443जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 4234 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबई महापालिकेने राज्य शासन आणि केंद्र सरकारने दिलेल्या आदेश नुसार कोविड 19 आजाराच्या तपासणीनंतर नव्या मार्गदर्शक तत्व जरी केली आहेत.
First published:

पुढील बातम्या