जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / लॉकडाऊनमुळे दारू, सिगारेट झाली बंद; असा करा विड्रॉल सिम्पटम्स सामना

लॉकडाऊनमुळे दारू, सिगारेट झाली बंद; असा करा विड्रॉल सिम्पटम्स सामना

याचसंबंधी कंपनीने एक प्रस्ताव मंजूर केला आहे. यात त्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे जे सिगारेट ओढत नाहीत. जे सिगारेट ओढत नाहीत त्यांना वर्षाला सहा सुट्ट्या जास्त मिळणार आहे. या सुट्ट्या ते वर्षभरात कधीही वापरू शकतात.

याचसंबंधी कंपनीने एक प्रस्ताव मंजूर केला आहे. यात त्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे जे सिगारेट ओढत नाहीत. जे सिगारेट ओढत नाहीत त्यांना वर्षाला सहा सुट्ट्या जास्त मिळणार आहे. या सुट्ट्या ते वर्षभरात कधीही वापरू शकतात.

लॉकडाऊनमध्ये कोणतीही अल्कोहोल सिगरेट उपलब्ध होणार नाही. त्यामुळे ज्यांना नशेची सवय लागली आहे त्यांच्यामध्ये विड्रॉल सिम्पटम्स तयार होतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 मार्च : संपूर्ण देशात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन आहे. आवश्यक वस्तू वगळता मॉल आणि दारूची दुकाने बंद आहेत. अशा वातावरणात, दारू, सिगारेट किंवा अमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या लोंकाना मोठ्या अडचणी येत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की अचानक दारू सोडणे सोपे नाही. राष्ट्रीय औषध अवलंबित्व उपचार केंद्र एम्सचे प्रा. डॉ. अतुल आंबेकर यांनी एका वृत्तवाहिणीशी संवाद साधताना लॉकडाऊन दरम्यान मद्य व सिगारेट इत्यादी बद्दल काय करावे हे सांगितले आहे. विड्रॉल सिम्पटम्स हे शरीरासाठी धोकादायक लॉकडाऊनमध्ये कोणतीही अल्कोहोल सिगरेट उपलब्ध होणार नाही. त्यामुळे ज्यांना नशेची सवय लागली आहे त्यांच्यामध्ये विड्रॉल सिम्पटम्स तयार होतात. अचानक दारू न मिळाल्यामुळे त्यांच्यात असे सिम्पटम्स दिसणं स्वाभाविक आहे. मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात की कोणत्याही वैद्यकीय सहाय्याशिवाय अचानक दारू न मिळाल्यामुळे तयार होणारे विड्रॉल सिम्पटम्स हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात. अशा लोकांना औषधांची नितांत आवश्यकता असते. डॉक्टरांचे औषध न मिळाल्यामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. हे वाचा - VIDEO: ‘तुम्ही लकी विनर आहात’ पोलिसांनी चक्क आरती करून बाहेर हिंडणाऱ्यांना धुतलं लोकांना दारू न मिळाल्यास पूर्ण वैद्यकीय सहाय्य मिळावे  सरकारने संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे, ही परिस्थितीत अत्यंत आव्हानात्मक आहे. दररोज दारूचे व्यसन असलेल्या लोकांना दारू न मिळाल्यास पूर्ण वैद्यकीय सहाय्य मिळावे हे सरकारने सुनिश्चित केले पाहिजे. जेव्हा आपण निकोटीन सोडता, घाबरू नका पण तुमच्यात ही लक्षणे दिसतील. डॉ. आंबेकर म्हणाले की, फक्त दारूच नाही तर निकोटीन सोडल्यामुळे चिंता, अस्वस्थता, डोकेदुखी, थकवा, दु: ख, सुस्ती, चिडचिडेपणा यासारख्या अनेक लक्षणं उद्भवू शकतात. पाणी, व्हिटॅमिन सी इत्यादी घेऊन दोन ते तीन दिवसांत या लक्षणांवर नियंत्रण मिळते. जेव्हा ही लक्षणे अधिक असतात, तेव्हा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. परंतु त्याच्या लक्षणांमुळे घाबरून जाण्याची गरज नाही. हे वाचा -  कुशीत 3 महिन्याचं लेकरू आणि अजून आठवडाभर चालणं, डोळ्यांत अश्रू आणणारी कहाणी मद्यपान करणार्‍यांना सल्ला ज्या लोकांना दारूचं व्यसन आहे आणि ज्यांना आता दारू मिळत नाही आहे अशा लोकांमध्ये विड्रॉल सिम्पटम्स नक्की असतील. पण अशा वेळी तल्लफ मिळवण्यासाठी इतर कामात लक्ष द्या. परंतु जेव्हा ही लक्षणे शारीरिक असतात तेव्हा त्वरित मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्या. दारू न मिळाल्यामुळे ही लक्षणं दिसली तर तत्काळ डॉक्टरकडे जा - हात थरथरने - अस्वस्थ - श्वास फुलणं - उलट्या, चक्कर - कमी झोप - विसरणे किंवा भ्रम हे वाचा -  Corona Virus: कोरोनाशी दोन हात करण्यासाठी लष्कराकडे आहे 6 तासांचा मास्टर प्लान

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात