‘मी समाजाचा शत्रू आहे, मी घरात थांबणार नाही’ घराबाहेर पडाल तर होईल अशी पंचाईत

‘मी समाजाचा शत्रू आहे, मी घरात थांबणार नाही’ घराबाहेर पडाल तर होईल अशी पंचाईत

तुम्ही समाजाचे शत्रू नसाल तर घराबाहेर पडू नका, अन्यथा तुम्हालाही अशा स्वरुपाच्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 मार्च : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) व्हायरसचा प्रभाव वाढत आहे. केंद्र सरकारने अधिकतर राज्यांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केलं आहे. अशा परिस्थितही नागरिक घराबाहेर पडत आहे. अद्याप भारताची परिस्थिती आटोक्यात असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

नागरिकांना कितीही आवाहन केलं तरी ते घराबाहेर पडतात. त्यांच्यावर नियंत्रण आणणं दिवसेंदिवस अवघड जात आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी वेगळ्याच प्रकारे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

संबंधित - उद्या रात्रीपासून फ्लाइटही LOCKDOWN, आंतरराज्यातील विमानाची उड्डाण बंद होणार

उत्तर प्रदेश व मध्यप्रदेशव्यतिरिक्त अनेक राज्यांमध्ये पोलीस विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना थांबवून त्यांना ‘मी समाजाचा शत्रू आहे, मी घरात थांबणार नाही’ असं लिहिलेल्या पेपर वाचायला दिला जात आहे. या पेपरसह त्यांचा फोटोही काढला जात आहे. उत्तर प्रदेशसह मध्य प्रदेशातील पोलिसांनी ही शक्कल लावली आहे. किमान आता तरी नागरिक विनाकारण घराबाहेर पडणार नाही, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

संबंधित - धक्कादायक! बंगालमध्ये कोरोनाचा पहिला बळी, भारतातील मृतांची संख्या 9 वर

त्यामुळे तुम्ही समाजाचे शत्रू नसाल तर घराबाहेर पडू नका, अन्यथा तुम्हालाही अशा स्वरुपाच्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2020 06:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading