नवी दिल्ली, 23 मार्च : कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उद्या (24 मार्च) मध्यरात्रीपासून आंतरराज्यातील विमानाची उड्डाणं बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे आतंरराज्य विमानांना उद्या रात्री 11.59 मिनिटांपर्यंत सर्व विमानांचं सुरक्षित लॅंडिंग करण्यास सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत देशात 9 जणांचा कोरोनामुळे (Covid - 19) मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी आंतरराज्यातील विमान उड्डाणे बंद करण्यात येणार आहे.
Corona Latest Update - देशभरात 19 राज्य पूर्णतः लॉकडाउन
देशभरातल्या Coronavirus च्या परिस्थितीची माहिती केंद्र सरकारतर्फे देण्यात आली. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढतो आहे. आतापर्यंत देशात 415 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशभरात 19 राज्यांमध्ये लॉकडाउची परिस्थिती आहे. आणखी 6 राज्यांमध्ये अंशतः लॉकडाउनची परिस्थिती आहे.
Domestic commercial airlines shall cease operations with effective from tomorrow midnight, that is 23.59 hours IST on 24/3/2020.
Airlines have to plan operations so as to land at their destinations before this time.
- @MoCA_GoI #CoronaVirusUpdates
1/2
— PIB in Maharashtra (@PIBMumbai) March 23, 2020
ICMR चे संचालक बलराम भार्गव म्हणाले, "देशभरात 12 लॅबोरेटरीजच्या चेन Coronavirus ची चाचणी करण्याचं काम करत आहेत. देशभरात या 12 लॅबची 15000 कलेक्शन सेंटर आहेत.
भारतासाठी (India) उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. कोरोनाव्हायरस (Coronavirus) दुसऱ्या टप्प्यातून (second stage) तिसऱ्या टप्प्यात (third stage) तर पोहोचला नाही ना? याबाबत इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) निकाल देणार आहे.
ICMR चे डॉ. आर. आर. गंगाखेडकर यांनी मॅथेमेटिकल मॉडेलवर काम सुरू असून, मंगळवारी त्याचा निकाल येईल असं सांगितलं आहे.