हैदराबाद, 29 नोव्हेंबर : तेलंगनाची(Telangana) राजधानी हैदराबादमध्ये(Hyderabad) एका चिकित्सक तरुणीची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात सध्या संपूर्ण देश पेटून उठला आहे. ट्विटरवरदेखील #RIPPriyankaReddy हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. पीडितेला न्याय मिळावा यासाठी ही मोहिम सुरु कऱण्यात आली आहे. या प्रकरणात आता राज्य सरकारच्या एका मंत्र्याने धक्कादायक वक्तव्य केलं आहे. तेलंगनातील गृहमंत्री महमूद(Mahmood ali mahmood)यांनी या प्रकरणामध्ये वादग्रस्त विधान करत म्हणाले की, ‘मृत तरुणी एक डॉक्टर होत्या. त्या शिक्षित होत्या. मग त्यांनी आधी बहिणीला फोन का केला? त्यांनी आधी 100 नंबरवर फोन करायला हवा होता ना’ महमूद यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. या सामूहिक बलात्कार प्रकरणी हैदराबादच्या सायबराबादा पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. यातील दोघे गाडीचे ड्रायवर आणि क्लीनर होते. मोहम्मद पाशा, नवीन, केशावुलू आणि शिवा अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी आरोपींनी पीडितेचं अपहरण केलं आणि नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पण याबद्दल कोणाला काही कळू नये म्हणून तिची हत्या केली. दरम्यान, लवकरच आरोपींना माध्यमांसमोर आणू असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. इतर बातम्या - डोंबिवलीत नागरिकांना फुटला घाम, ड्रॉवर आणि कपाटात आढळला साप काय आहे संपूर्ण प्रकरण? पीडित तरुणी बुधवारी कोल्लारु इथे पशु चिकित्सालयात गेली होती. तिने स्कूटी शादनगर टोल प्लाझाजवळ पार्क केली होती. रात्रीच्या वेळी निघताना गाडी पंक्चर झाल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिने बहिणीला कॉल केला. पीडितेला भीती वाटत असल्यामुळे तिच्या ताईने तिला कॅबने येण्यास सांगितलं. पण तितक्यात मला कोणी तरी मदत करत असल्याचं सांगून पीडितीने फोन ठेवला. त्यानंतर तिचा फोन स्वीच ऑफ झाला. कुटुंबीयांनी टोल प्लाझाच्या परिसरात पीडितेचा शोध घेतला मात्र, ती सापडली नाही. सकाळी शादनगरजवळ तिचा मृतदेह आढळला. तिचे कपडे घटनास्थळापासून काही अंतरावर सापडल्याने बलात्कारानंतर खून झाल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. बुधवारी रात्री एक तरुण पीडितेची गाडी घेऊन 9.30 च्या सुमारास त्याच्याकडे आला असल्याचं शमसेर आलम नावाच्या मेकॅनिकने सांगितलं. तरुणाने गाडी त्याच्याकडे सोडली आणि निघून गेला अशी माहिती मेकॅनिकने पोलिसांना दिली. इतर बातम्या - ‘शिवसैनिकाला रामाचं, अयोध्येचं नाव घेण्यासाठी आता 10 जनपथावर नाक रगडावं लागेल’ पीडितेच्या खूनाचा उलगडा करण्यासाठी हैदराबाद पोलीस सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करत आहेत. याशिवाय पीडितेच्या फोनवर कोणाचे कॉल आले याचाही तपास केला जात आहे. पोलीस उपायुक्त प्रकाश रेड्डी यांनी सांगितले की, अज्ञात व्यक्तीने पीडितेची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह जाळण्यात आला. सध्या या प्रकऱणाचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







