जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / डोंबिवलीत नागरिकांना फुटला घाम, ड्रॉवर आणि कपाटात आढळला साप

डोंबिवलीत नागरिकांना फुटला घाम, ड्रॉवर आणि कपाटात आढळला साप

डोंबिवलीत नागरिकांना फुटला घाम, ड्रॉवर आणि कपाटात आढळला साप

डोंबिवलीच्या एमआयडीसी पोस्ट कार्यालयाच्या आतमध्ये मागील काही दिवसांपासून नाग, मण्यार इत्यादी जातीचे विषारी सर्प येत आहेत. त्यामुळे इथला कर्मचारी वर्ग भयभहीत झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अजित मांढरे, प्रतिनिधी डोंबिवली, 29 नोव्हेंबर : नेहमी प्रमाणे ऑफिसमधला ड्रॉवर उघडला आणि त्यात साप दिसला तर? या गोष्टीची साधी कल्पनाही करवत नाही असा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. डोंबिवलीच्या एमआयडीसी पोस्ट कार्यालयाच्या आतमध्ये मागील काही दिवसांपासून नाग, मण्यार इत्यादी जातीचे विषारी सर्प येत आहेत. त्यामुळे इथला कर्मचारी वर्ग भयभहीत झाला आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे एक साप टेबलाच्या खणात बसलेला आढळला तर काही टेबल, कपाटाच्या खाली सापडत आहेत. पोस्ट ऑफिस आवारात मोठे गवत, झाडी वाढलेली असून जुने सामान, कचरा पडलेला आहे. पोस्ट ऑफिसच्या बाजूच्या भूखंडावर आणि रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. यामुळे इथे उंदीर, घुशींचं प्रमाण वाढल्याने ऑफिसचे दरवाजे, खिडक्यांच्या पोकळीतून उंदीर, साप येत असावेत अशी शंका आहे. इतर बातम्या - ‘शिवसैनिकाला रामाचं, अयोध्येचं नाव घेण्यासाठी आता 10 जनपथावर नाक रगडावं लागेल’ आता उंदीर, घुशी समजू शकतो पण जर ऑफिसमध्ये साप येत असतील तर ही गंभीर बाब असल्याचं कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे. सर्प चावल्याची अनुचित घटना घडली तर याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न कर्मचारी वर्ग आणि इथे रोज कामांसाठी येणाऱ्या महिला बचत पोस्ट एजंट विचारत आहेत. याच पोस्ट ऑफिसमध्ये भविष्यात पासपोर्ट कार्यालय येणार आहे. पोस्ट ऑफिसमधील या प्रश्नाबाबत डोंबिवली वेलफेअर असोसिएशन तर्फे पोस्टाच्या वरिष्ठ अधिकारी, खासदारांना विनंती करून लक्ष वेधणार आहेत. ऑफिसमध्ये साप आढळल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे या ऑफिसमध्ये काम करावं का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. दरम्यान, यावर तात्काळ अॅक्शन घेणं महत्त्वाचं आहे. नाहीतर हे एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: dombiwali
  • First Published :
जाहिरात
जाहिरात