ब्रुसेल्स, 05 मार्च : आईने आपल्या पोटच्या 5 लेकरांचा जीव घेतल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. आपल्या पाचही मुलांची तिने गळा चिरून हत्या केली आहे. मुलांच्या हत्येनंतर आईने स्वतःही जीव देण्याचा प्रयत्न केला. तिने आपल्या पोटात चाकू खुपसला पण तिला मरण आलं नाही. आपल्या मृत्यूसाठी ती तडफडत राहिली. मृत्यूची भीक मागू लागली. बेल्जिअममधील ही भयानक घटना आहे.
56 वर्षांची जेनेव्हीव लेर्मिट्टे असं या महिलेचं नाव आहे. तिचा नवरा शहराबाहेर गेला होता तेव्हा तिने हे धक्कादायक कृत्य केलं. घरात झोपलेल्या आपल्या पाचही मुलांचा गळा चिरून त्यांची हत्या केली. त्यात चार मुली आणि एक मुलगा होता. ही मुलं 3 ते 14 वयोगटातील होती. मुलांच्या गळ्यावरून चाकू फिरवल्यानंतर तिने तोच चाकू आपल्या शरीरात खुपसला. तिने खूप प्रयत्न केले पण तिला जीवच जाईना. अखेर तिने स्वतःच अॅम्ब्युलन्सला फोन करून बोलावलं आणि रुग्णालयात दाखल झाली.
40 वर्षांत एकदाही रोमान्स नाही; 57 व्या वयात महिलेने पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवले आणि...
हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. तिला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. कदाचित ती मानसिकरित्या आजारी असावी असं समजून अधिकाऱ्यांनी तिला मनोरुग्णालयात दाखल केलं.
गेल्या कित्येक वर्षांपासून ती आपल्या मृत्यूची भीक मागत आहे. अखेर सरकारने तिचं ऐकलं. गेल्या काही दिवसांपूर्वी तिला मरण देण्यात आलं. स्काय न्यूजच्या वृत्तानुसार जेनेव्हिव चे वकील निकोलस कोहेन यांनी कोर्टात सांगितलं की, तिला असह्य वेदना होत होत्या. मंगळवारी मोंटिगनी ले टिलूलमध्ये लिओनार्ड द विंची हॉस्पिटलमध्ये तिची मरणाची इच्छा पूर्ण करण्यात आली. मुलांच्या मृत्यूबाबत शेवटपर्यंत तिला पश्चाताप होत होता. तिला इतकी घुसमट होत होती की तिला लगेच मृत्यू हवा होता.
आता काय म्हणावं हिला! म्हणे, 'नवरा नको, स्मार्टफोन हवा'; मोबाईलवेड्या पत्नीने शेवटी पतीला....
बेल्जिअममध्ये फक्त कधीही बरा न होणाऱ्या शारीरिक वेदनाच नव्हे तर असह्य मानसिक समस्या असलेल्या पीडितांनाही कायद्यानुसार इच्छामरण मिळतं. सामान्यपणे अशा लोकांना एक खतनारक इंजेक्शन दिलं जातं, ज्यामुळे काही क्षणात मृत्यू होतो. पण या महिलेला कोणत्या पद्धतीने मारण्यात आलं याची माहिती नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Murder, Parents and child